
आजरा ः गुरुवारी मोर्चा बातमी
गिरणी कामगारांचा गुरुवारी तहसीलवर मोर्चा
आजरा ः गिरणी कामगारांना व वारसदाराना मुंबईतच घर मिळाले पाहीजे, या मागणीसाठी गुरूवारी (ता.९) गिरणी कामगारांचा तहसील कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन होत आहे. सर्व श्रमिक संघटनांच्या वतीने गिरणी कामगारांना संघटित करून कोल्हापूर जिल्ह्यातील तहसील व प्रांत कार्यालयावर हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार मोर्चाने जावून आपले निवेदन शासकिय यंत्रणे मार्फत मुख्यमंत्री यांना देणार आहेत. अशी माहीती प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे. आपले हक्काचे घर ताबडतोब मिळावे व गिरणीकामगार वारसदार हक्क कायम रहावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे .जिल्ह्यातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कागल, शाहूवाडी येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर राज्यातील गिरणी कामगार व वारसदारांचा धडक मोर्चा होणार असून याच्या नियोजनासाठी कॉ.अतुल दिघे, कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. शांताराम पाटील, अमृत कोकितकर, गोपाळ गावडे, कृष्णात चौगले, सदाशिव खोपडे यांच्यासह पदाधिकारी गावपातळीवर बैठका घेत आहेत.
...
01948
मलकापूरः येथील शाळी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाचे ढासळू लागलेले संरक्षक कठडे.
...
शाळी नदीवरील पुलाची दुरवस्था
मलकापूर- येथील कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील ब्रिटीशकालीन शाळी नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे संरक्षक कठडे ढासळू लागले आहेत. पुलाची डागडूजी तातडीने करावी अन्यथा १४ मार्च रोजी पुलावर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालय व रस्ते विभाग कार्यालयास लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, या पुलावरुन अवजड वाहनांची सतत ये -जा असते. मात्र सध्या या पुलाचे संरक्षक कठडे ढासळू लागले आहेत. त्यामुळे वहातुकीस धोका निर्माण होऊ शकतो. ते टाळण्यासाठी संरक्षक कठडे डागडुजी तातडीने करावी. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील स्वच्छता करावी. अन्यथा १४ मार्च रोजी पुलावर रास्ता रोको करू. निवेदनावर प्रवीण प्रभावळकर, युवराज काटकर, संजय वाकडे, राजू केसरे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.
...
धामोडमध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी ‘गांधीगिरी’
धामोड : येथील ग्रामपंचायतीने घरफाळा व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी पदाधिकारी व शासकीय यंत्रणा यांनी थकबाकीदाराच्या दारातच गांधीगिरीने वसुली सुरु केली आहे. येथील थकबाकीचे प्रमाण जास्त असल्याने वसुलीसाठी पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी एकत्रित मोहिम राबविली आहे. धामोडसह लाडवाडी ,कुरणेवाडी ,जाधववाडी , तुळशी धरण वसाहत, देऊळवाडी या गावांचा ग्रामपंचायतीत समावेश होतो. कोरोनामुळे चार वर्षांपासून घरफाळा व पाणीपट्टी यांची थकबाकी राहिली आहे. वीज बिल, कामगारांचे पगार अशा अनेक बाबींचा ग्रामपंचायतीसमोर प्रश्न आहे. त्यामुळे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. सरपंच रेश्मा नवणे, उपसरपंच मारुती तामकर, एन. जी. नलवडे, श्रीमाबाई चौगले ,विश्वास गुरव ,सुभाष कदम ,संदीप नलवडे, सागर कांबळे, नेत्रांजली कोरे, विलास कदम, विलास पाटील,सुवर्णा पाटील, प्रवीण तेली हे पदाधिकारी व ग्रामसेवक संतोष गुरव हे मोहीमेत सहभागी झाले आहेत.
...