
वनस्पतीजन्य रंग कार्यशाळा
87446
अवनि, स्वानंदीची पहिल्या क्रमांकावर मोहर
वनस्पतीजन्य रंग कार्यशाळेसह चेहरा रंगवणे स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय, निसर्गमित्र परिवार व जीवन कल्याण बाल मंदिर (कसबा बावडा) यांच्या संयुक्त विद्यमाने रंगपंचमीनिमित्त वनस्पतीजन्य रंगानी चेहरा रंगवणे स्पर्धा व पालकांसाठी वनस्पतीजन्य रंगाची कार्यशाळा झाली. स्पर्धेमध्ये तीसहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत अवनि उलपे, स्वानंदी दाभाडे यांनी पहिला क्रमांक पटकावला.
दरम्यान, पार्थ बचाटेने दुसरा, शरण्या उलपेने तिसरा, मंदार कांबळेने चौथा तर रूद्र भोसले, स्वराली पाटीलने उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली.
स्पर्धकांना संस्थेने वनस्पतीजन्य रंग दिले. पालकांनी मुलांच्या चेहऱ्यावर वनस्पतीजन्य रंगाचा वापर करून वाघ, फुलपाखरू, मांजर, कुत्रा, मिकीमाऊस, श्रीकृष्ण, महाकाली चित्ता, निसर्ग चित्र, भारताचा ध्वज अशा विविध कलाकृती साकारल्या.
महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यांनी उपस्थितांना वनस्पतीजन्य रंग वापरण्याचे आवाहन केले. परीक्षण पराग केमकर, राणिता चौगुले यांनी केले.
वनस्पतीजन्य रंगांबद्दलचे महत्त्व, उपयोग व कृती याविषयी अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक मेघा पाटील यांनी केले. जयश्री सुर्वे, रुपाली परीट, संजय शिंदे, मोहन जाधव यांनी संयोजन केले. अस्मिता चौगुले यांनी आभार मानले.