राज्यस्तरीय काव्यसंमेलन

राज्यस्तरीय काव्यसंमेलन

फक्त फोटो 87512 (आवश्‍यक)
----
87461
‘स्टेपिंगस्टोन’ चित्रफितीचा आज पहिला शो
कोल्हापूर ः यशाबरोबर अपयश, अपघात आणि दुखापत या सर्वांवर मात करीत कोकणकड्यापर्यंतचा गिर्यारोहणाचा प्रवास उद्या (बुधवारी) ‘स्टेपिंग स्टोन’ या चित्रफितीतून अनुभवायला मिळणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहाला हा कार्यक्रम होईल. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, रिझर्व्ह बॅंकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रफितीचा पहिला शो होणार आहे.
क्षेत्रफळाने सर्वात मोठ्या असणाऱ्या हरिश्चंद्रगडाचा पश्चिम कडा म्हणजे कोकणकडा. दोन हजार फूट उंचीचा हा अजस्त्र कडा भारतातील गिर्यारोहकांचे प्रमुख आकर्षण. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या या कड्यावर खुशी कांबोज आणि अरमान मुजावर या दोन मुलींनी यशस्वी आरोहण करून गिर्यारोहण क्षेत्रात अठराशे फुटांची कातळ भिंत चढाईचाही इतिहास रचला. त्यासोबतच अशा अनेक सुळक्यांवर फक्त मुलींच्या टीमने चढाई करण्याचा मान मिळविला आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
............
पहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात
कोल्हापूरः नृसिंहवाडी येथील वासुदेव मंगल कार्यालयात नुकतेच राज्यस्तरीय काव्य संमेलन झाले. कल्याण राऊत यांच्या ‘श्वास माझे तुझ्यासाठी’, रोहिणी पराडकर यांच्या ‘किलबिलाट’ या बालकविता संग्रहाचे आणि ऋचा महाबळ यांच्या ‘समर्पिता’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. गुंडो पुजारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले. गिरीश भट, अवधूत पुजारी व प्रशांत आडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शरदचंद्र काकडे दाम्पत्याचा यावेळी सामाजिक कार्यासाठी सत्कार झाला. पूनम सावंत व सिमंतीनी हर्डीकर यांच्या सुरेख रांगोळीने सर्वांचे स्वागत झाले. जयश्री पवार, सागर गुरव, साधना घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनास कोल्हापूर मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, बंगळूर, सांगली, सातारा, बारामती येथून कवींनी उपस्थिती लावली. भारतीय कोल्हापूर मंचच्या प्रमुख रोहिणी व अमोल पराडकर यांनी संयोजन केले.
............
87460
‘संवाद''तर्फे पथनाट्यातून जनजागृती
कोल्हापूर : ध्वनी प्रदूषण टाळा, डॉल्बीला आळा घालून कानाचे आरोग्य जपण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर नुकताच झाला. संवाद स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकतर्फे जागतिक श्रवण दिनानिमित्त शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, भवानी मंडप आदी ठिकाणी पथनाट्ये सादर झाली. सुरेखा पाटील, रश्मी धनवडे, शिल्पा कांबळे, जयश्री कांबळे, दीपाली गायकवाड, माणिक मेंच, संग्राम नांगरे, कल्याणी कुलकर्णी, स्नेहा शेट्ये, स्वाती कवाळे यांच्यासह कर्णबधिर मुलांचा त्यामध्ये सहभाग होता. ‘संवाद’च्या संचालक शिल्पा हुजूरबाजार, यश हुजूरबाजार यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com