विद्यापीठातील १५ अभ्यासमंडळांचे अध्यक्ष ‘बिनविरोध’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठातील १५ अभ्यासमंडळांचे अध्यक्ष ‘बिनविरोध’
विद्यापीठातील १५ अभ्यासमंडळांचे अध्यक्ष ‘बिनविरोध’

विद्यापीठातील १५ अभ्यासमंडळांचे अध्यक्ष ‘बिनविरोध’

sakal_logo
By

लोगो
...

पंधरा अभ्यास मंडळांचे अध्यक्ष ‘बिनविरोध’

शिवाजी विद्यापीठः सात जणांची निवडणुकीत बाजी, एकूण २७ मंडळांचे गठन

कोल्हापूर, ता. ७ : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका सोमवारी पूर्ण झाल्या. शिवाजी विद्यापीठात एकूण २७ अभ्यास मंडळांचे गठन झाले आहे. या मंडळांचे अध्यक्ष निवडण्यासाठीची अधिसूचना १३ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्गमित करण्यात आली होती. त्यानुसार, आज प्रत्यक्ष निवडणुका होवून विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली. त्यात १५ अभ्यास मंडळांसाठी अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली.
बिनविरोध निवड झालेल्या अध्यक्षांमध्ये डॉ. किशोर डी. कुचे (गणित अभ्यास मंडळ), सुनील गायकवाड (प्राणीशास्त्र), गुरू मुणवल्ली (स्थापत्य अभियांत्रिकी), मनिष भाटिया (औषध निर्माणशास्त्र), केदार मारूलकर (वाणिज्य), शर्वरी कुलकर्णी (व्यवस्थापन), नंदकुमार कदम (लेखापरीक्षण), पी. एस. कांबळे (व्यावसायिक अर्थशास्त्र), तृप्ती करेकट्टी (इंग्रजी), जयवंत इंगळे (अर्थशास्त्र), रविंद्र भणगे (राज्यशास्त्र), चंद्रवदन नाईक (इतिहास), अर्चना कांबळे (समाजशास्त्र), भरमू मर्जे (शिक्षणशास्त्र), निशा पवार (पत्रकारिता) यांचा समावेश आहे. सात अभ्यास मंडळासाठी सोमवारी प्रत्यक्ष मतदान होऊन अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. एस. एस. कोळेकर (रसायन व रसायन तंत्रज्ञान), प्रशांत शाह (इलेक्ट्रॉनिक्स), राजाराम गुरव (वनस्पतीशास्त्र), बाळासाहेब जाधव (भूगोल व भूशास्त्र), विजय घोरपडे (संगणकशास्त्र), रणधीर शिंदे (मराठी), साताप्पा सावंत (हिंदी) यांचा समावेश आहे.
...


पाच मंडळांची अध्यक्षपदे रिक्त

संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मानसशास्त्र, यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरींग) या पाच अभ्यास मंडळांसाठी एकाही पात्र उमेदवाराने आपले नामनिर्देशन भरले नाही. त्यामुळे अध्यक्षपदे रिक्त राहिली आहेत. त्यातील संख्याशास्त्र विभागात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर भौतिकशास्त्र विभागामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी काम केले आहे. त्यांच्याशी संबंधित या विभागांमधील अध्यक्षपद रिक्त राहिल्याची चर्चा होत आहे. संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र मंडळातील सदस्य अध्यक्षपदाच्या प्रक्रियेत सहभाग झाले नाहीत. सूक्ष्मजीवशास्त्र, यंत्रअभियांत्रिकीमधील कोणी सदस्य पात्र ठरले नाहीत, तर मानसशास्त्रमध्ये सदस्य पात्र असून देखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला नाही.
...

अभ्यासमंडळे काय करतात?

अभ्यासमंडळे संबंधित विद्याशाखेचा अभ्यासक्रम निश्‍चिती, रचना, प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप ठरविणे आदी स्वरूपातील शैक्षणिक काम करतात. या मंडळात एकूण ११ सदस्य असतात. ते आपल्यापैकी एका सदस्याची अध्यक्षपदी निवड करतात.