
महिला दिन
केंद्रीय संचार ब्युरतर्फे
महिलांसाठी आजपासून
शिबिरांचे आयोजन
कोल्हापूर, ता. ७ : केंद्रीय संचार ब्युरोच्या कोल्हापूर कार्यालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या (ता. ८) पासून महिला सबलीकरण संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आणि जन जागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. १२ मार्चपर्यंत पाच दिवस प्रदर्शन सुरू राहणार असून दरम्यान जनजागृतीची शिबिरे घेतली जाणार आहेत.
शालिनी पॅलेस समोरील बागेतील प्रदर्शनात महिला कल्याणाच्या केंद्र, राज्य सरकारच्या, महापालिकेच्या विविध योजनांची माहिती पहायला मिळणार आहेत. तसेच पत्र सूचना कार्यालयाने प्रशिक्षण शिबिर आणि कार्यशाळांचे आयोजन केले आहे. उद्घाटनाच्या सत्रात सकाळी साडेअकराला माणदेशी फाउंडेशनचे महिलांसाठी डिजिटल साक्षरता शिबिर होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कायदेविषयक साक्षरतेसाठी ॲड. संतोष शहा यांचे शिबिर होईल. ११ मार्च रोजी एकलव्य फाउंडेशनचे आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील मुलांसाठी दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर प्रशिक्षण शिबिर आहे. दुपारी २ ते ४ वेळेत हे शिबिर होईल. काही पथके सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करतील.