महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

महिला दिनानिमित्त
होणार महिलांचा सन्मान

कोल्हापूर ः जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहर परिसरातील सामाजिक संस्‍था, संघटना यांच्यातर्फे महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुणवंत महिलांना गौरविण्यासह व्याख्यानही होईल.
गार्डन्स क्लबतर्फे महिला दिनानिमित्त वसंतोत्सव होणार असून, रुईकर कॉलनी मैदानावर विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रात्यक्षिके व खाद्य महोत्सव भरवला जाणार आहे. तसेच तपोवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तपोवन येथील चव्हाण कॉलनी, विरंगुळा केंद्रात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध क्षेत्रांतील महिलांना गौरविण्यात येणार आहे. विरंगुळा केंद्र, टाऊन हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल.