आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आढावा बैठक
आढावा बैठक

आढावा बैठक

sakal_logo
By

87535
कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठा तसेच अन्य प्रश्‍नांबाबत आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पाणीपुरवठ्याबाबत चालढकलपणा नको
ऋतुराज पाटील; स्मशानभूमी, रंकाळ्याबाबत पाठपुरावा कराव्याच्या सूचना
कोल्हापूर, ता. ७ : शहरातील प्राणीप्रश्‍नावर ठोस उपाययोजना करा, चालढकलपणा सहन करणार नाही, असा इशारा आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला. आठवड्यात मुबलक पाणीपुरवठा झाला पाहिजे. स्मशानभूमी, रंकाळा तलाव परिसर, स्ट्रीट लाईट, रस्ते कामांबाबत तत्काळ पाठपुरावा करावा, अशा सूचनाही केल्या.
विविध कामांबाबत आमदार पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात माजी नगरसेवकांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल जल अभियंता हर्षजित घाटगे यांना धारेवर धरले. मुबलक पाणी मिळालेच पाहिजे, असे शारंगधर देशमुख, आदील फरास यांच्यासह साऱ्यांनी सांगितले. तांत्रिक अडचणी दूर करून नियमित पाणीपुरवठा होईल, असे घाटगे यांनी सांगितले. मात्र समाधान न झाल्याने सारे आक्रमक झाले. आमदार ऋतुराज पाटील यांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्या, ठोस उपाययोजना करा अशा सक्त सूचना करत आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सहन करणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.
रस्ते, स्ट्रीट लाईट याबाबतही तात्काळ पाठपुरावा करावा, असे आमदार पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले. नालेसफाईसाठी नियोजन करून अंमलबजावणी करावी, असेही सांगितले. रंकाळा तलावाचे मूळ रूप आणि सौंदर्य अबाधित राखून आलेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा. मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना आमदार पाटील यांनी सांगितले. माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आशिष पोवार यांनी स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत सवाल उपस्थित केला. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना सर्व कामांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, अर्जुन माने, धीरज पाटील, मधुकर रामाणे, प्रकाश गवंडी, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, नियाज खान, महेश उत्तुरे, अशपाक आजरेकर, दुर्वास कांबळे, विश्वजीत मगदूम, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंते, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.