स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे तिरडी मोर्चा

स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे तिरडी मोर्चा

ich84.jpg
87662
इचलकरंजी : स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे प्रांत कार्यालयासमोर तिरडीचे दहन करण्यात आले.
-----------------------
स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे तिरडी मोर्चा

इचलकरंजी, ता. ८ : केंद्र सरकारने ४५० रुपयांना मिळणारा स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर एक हजार ११० रुपयांवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे गोरगरीब महिलांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर विकत घेणे मुश्कील बनले आहे. सोबत अन्य आवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या महागाईला तातडीने आळा घालून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी महिला दिनाचे औचित्य साधून स्वाभिमानी महिला आघाडीतर्फे प्रांत कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. महिलांनी बोंब मारो आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.
मोर्चाची सुरवात के. एल. मलाबादे चौक येथून झाली. महिलांनी महागाईची प्रतीकात्मक तिरडी घेतली होती. तिरडी प्रांत कार्यालयासमोर आणून दहन केली. मोर्चामध्ये सहभागी महिलांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चामध्ये संगीता राजू शेट्टी, पद्माराणी पाटील, शुभांगी शिंदे, सुवर्णा अपराज, रेवती पाटील, उज्ज्वला गोंधळी, एम. एस. पाटील, एस. एन. देवमोरे, विमल पाटील, कमल पाटील, सुवर्णा पाटील, सुशीला पाटील, वैशाली पाटील, सुनीता पाटील, सुजाता पाटील, भाग्यश्री नाईक, सपना पाटील, कोमल शेंडगे आदींचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com