
‘शिक्षणशास्त्र’ प्राचार्य शिक्षक, कर्मचार्यांचा मुंबईत अन्नत्याग
87675
मुंबई : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.
‘शिक्षणशास्त्र’ प्राचार्य शिक्षक,
कर्मचाऱ्यांचा मुंबईत अन्नत्याग
गडहिंग्लज, ता. ८ : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील २००१ पूर्वीच्या ७९ शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर १७ दिवसापासून अन्नत्याग व धरणे आंदोलन सुरु आहे. प्राचार्या डॉ. मेघा गुळवणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. शासनाने २००१ पूर्वीच्या पारंपारिक व विधी विज्ञान महाविद्यालयांना अनुदान घोषित केले आहे. मात्र शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची दखलच घेतलेली नाही. २०१४ पासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा आंदोलने केली. २०२२ पर्यंत विभागीय संचालकांनी महाविद्यालये अनुदानास पात्र असल्याचा अहवाल दिला आहे. तरीही शासनाने दखल घेतलेली नाही. आर्थिक विवंचनेत प्राचार्य, शिक्षकांसह कर्मचारी काम करत आहेत. विना अनुदानावरसुद्धा ही महाविद्यालयचे अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. सध्या मुंबईतील आंदोलनात ज्ञानदानाचे काम बंद पडू नये यासाठी आळीपाळीने शिक्षक सहभागी होत आहेत. शासनाने दखल घेतलीच नाही तर शिक्षणशास्त्र महाविद्यालये बंद करुन आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा दिला आहे. २००१ पूर्वीच्या महाविद्यालयांची तपासणी करुन अनुदानास पात्र असल्याची निश्चिती केली होती. याची नोंद घेवून शासनाने अनुदान मंजूर करावे, अशी मागणी आहे.