रिंगरोड खंडीत केल्याने 
विकास आराखडा रद्द करा

रिंगरोड खंडीत केल्याने विकास आराखडा रद्द करा

87676
गडहिंग्लज : वाढीव हद्दीचा विकास आराखडा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन रिंग रोड कृती समितीच्या शिष्टमंडळाने हसन मुश्रीफ यांना दिले.

रिंगरोड खंडीत केल्याने
विकास आराखडा रद्द करा
गडहिंग्लज, ता. ८ : शहराच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा जाहीर केला आहे. जुन्या आराखड्यातील रिंगरोड या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये खंडीत करण्यात आला आहे. यामुळे दळणवळणाचा प्रश्‍न निर्माण होणार असून नागरिकांच्या अडचणींचा हा आराखडा तत्काळ रद्द करा अशी मागणी रिंग रोड कृती समितीने केली आहे.
याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. या आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी आहेत. प्रस्तावित केलेली अनेक आरक्षणे पूर बाधित क्षेतात आहेत. त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करु शकत नाही. सध्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रादेशिक विकास आरखडा 2017 मध्ये शासनाने मंजूर केला आहे. त्यातील रस्ते, रिंगरोड काही ठिकाणी जागेवर विकसीत केल्याचे व ले आऊटमध्ये सोडलेले आहेत. असे रिंगरोड या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यात खडीत केले आहेत. मुळात शहरावर वाहतुकीचा मोठा आहे. त्यासाठी रिंगरोड पूर्ण करण्याची धडपड सुरु असताना आराखड्यात खंडीत केल्याने वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. अंमलबजावणी न होऊ शकणारा व नागरिकांच्या अडचणीचा हा आराखडा रद्द करावा अशी मागणी आहे.
प्रा. सुनिल शिंत्रे, डॉ. एम. एस. बेळगुद्री, बसवराज आजरी, चंद्रकांत सावंत, रमजान अत्तार, शेखर यरटे, नागेश चौगुले, विरुपाक्ष पाटणे आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. यावेळी सतीश पाटील, किरण कदम, सुरेश कोळकी, रश्मीराज देसाई, रामगोंड उर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com