महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग जागरूकता फेरी

महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग जागरूकता फेरी

87778

जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःची
काळजी घ्या ःअरुंधती महाडिक

कोल्हापूर, ता. ८ ः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त ‘स्तन कर्करोग जागरूकता व उपचार’ जनजागृती फेरी काढली. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूधंती महाडिक यांच्या हस्ते झेंडा दाखवून ताराराणी चौकातून फेरीची सुरूवात झाली.
सौ. महाडिक म्हणाल्या, ‘‘महिलांनी आजच्या धावपळीच्या युगात सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.’’ प्रा. डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, ‘‘स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. प्राथमिक अवस्थेत निदान आणि उपचार केल्यास तो संपूर्ण बरा होऊ शकतो.’’ ताराराणी चौकातील छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेल्या फेरीची दाभोळकर चौक, स्टेशन रोडमार्गे येऊन दसरा चौकात सांगता झाली. फेरीमध्ये एस. जे. पी. ई. एस. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वेणुताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक वैद्यकिय महाविद्यालय, डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, कै. हौसाबाई मगदूम होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, ई. बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, सावित्रीबाई फुले परिचर्या विद्यालय, सिद्धगिरी परिचर्या महाविद्यालय, डॉ. दीपक पाटील परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कोल्हापूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ. राजकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रा. डॉ. सुदेश गंधम यांनी मानले. या वेळी डॉ. रविकुमार जाधव, डॉ. रोझारिओ डिसुझा, डॉ. एस. जी. कुलकर्णी, डॉ. राजेश कागले, डॉ. केदार तोडकर, डॉ. रणजीत पाटील, डॉ. विद्या घेवडे, जगदीश माळी, सुशीला लांबा, एकता गवळी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com