कृती समितीचे प्रांताधिकाऱ्यांना साकडे

कृती समितीचे प्रांताधिकाऱ्यांना साकडे

87694
गडहिंग्लज : नूलमधील क्रशर बंद करण्याच्या मागणीचे निवेदन बाबासाहेब वाघमोडे यांना देताना जितेंद्र शिंदे, श्रीरंग चौगुले, महेश कदम, कुमार देसाई, महेश हंचनाळे, सागर मांजरे आदी.

कृती समितीचे प्रांताधिकाऱ्यांना साकडे
नूलमधील क्रशर-खडी वाहतूक बंद करा; नव्या क्रशरना परवानगी न देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : नूल (ता. गडहिंग्लज) येथील स्टोन क्रशर व गायरान जमिनीतून सुरु असलेली बेकायदेशीर खडी वाहतूक बंद करण्यासाठी क्रशर विरोधी कृती समितीने प्रांताधिकाऱ्यांना साकडे घातले. त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच नवीन होऊ घातलेल्या कोणत्याही क्रशरला परवानगी देऊ नये, अशी विनंतीही केली आहे.
निवेदनात म्हटले आहे; नूल गावच्या हद्दीत येणेचवंडी रोडवर स्टोन क्रशर सुरु आहे. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देत असताना क्रशर सुरु करु नये म्हणून ६६ ग्रामस्थांनी हरकती नोंदविल्या होत्या. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे स्टोन क्रशर सुरु झाले आहे. सदर क्रशरच्या खडी वाहतुकीसाठी क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने गायरान जमिनीतून व गावातील मुख्य रस्त्यावरुन ये-जा करीत आहेत. त्याविरोधात ग्रामसभेत एकमुखी ठराव केला. पण, ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे बेकायदेशीर खडी वाहतूक सुरुच आहे. तरी या प्रश्‍नात आपण लक्ष घालून खडी वाहतूक बंद करावी. तसेच क्रशर बंद करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. जितेंद्र शिंदे, डॉ. महेश कदम, श्रीरंग चौगुले, कुमार देसाई, महेश हंचनाळे, सागर मांजरे, सुनील नांगरे, अमर चव्हाण, बाजीराव पाटील, मल्हार शिंदे, सागर शिंदे, डॉ. दिलीप मांजरेकर, सचिन चितारी, इंद्रजित निकम आदींनी हे निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com