आजरा ः आगीत काजू बागांचे नुकसान

आजरा ः आगीत काजू बागांचे नुकसान

87710
खेडे (ता. आजरा) ः येथे वणव्यात काजू बागेचे झालेले नुकसान.
...

खेडेतील आगीत काजू,
चिकू बागेचे नुकसान

आजरा, ता. ८ ः खेडे (ता. आजरा) येथे आजरा - गडहिंग्लज मार्गालगत असलेल्या इंण्डेन गॅस गोडावून नजीकच्या शेतात आज लागलेल्या आगीत नंदकुमार देसाई व पांडुरंग कुंभार या शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. सहा एकरातील परिसर जळून गेला आहे. यामध्ये काजू, आंबा व चिकूची झाडे जळालेली आहेत. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.
आज दुपारी बारा वाजता या परिसरात आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट आजरा- गडहिंग्लज मार्गावरून ये- जा करणाऱ्या वाहनधारकांना दिसल्या. त्यांनी याबाबतची माहीती संबंधित शेतकऱ्यांना दिली. शेतकरी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाणी, झाडांच्या फांद्या याचा वापर करून आग विझवण्यास सुरवात केली. वाळलेले गवत, पाला पाचोळा व रणरणत्या उन्हामुळे आग पसरत गेली. ती आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु होती. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
...

* चाफवडेतील वणव्यात काजू बागेचे नुकसान
चाफवडे (ता. आजरा) येथे लागलेल्या वणव्यात काजू बागेचे नुकसान झाले आहे. प्रकाश मणकेकर यांची काजूची बाग जळून गेली आहे. त्यांची सात एकरातील जमिनीमधील गवत व झाडे जळून गेली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com