पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी खाटांगळेतील चौघांवर गुन्हा

कोल्हापूरः खाटांगळे (ता.करवीर) येथे मोटारीची काच फोडून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सरदार नारायण पोवार, युवराज शिंगराप्पा खाडे, राजाराम पोवार यांची पत्नी, पिंकी पोवार अशी संशयित आरोपींची नावे असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री खाटांगळे येथे फिर्यादी वंदना पोवार आणि त्यांचे पती संजय, मुलगा हे त्यांच्या पोल्ट्री फार्म येथे साहित्य हलवित होते. यावेळी वंदना यांचे चुलत दीर सरदार आणि युवराज यांनी काठीने वंदना यांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले. राजाराम पोवार यांच्या पत्नीने काठीने वंदना यांना चेहऱ्यावर व दंडावर मारहाण केली. पिंकीने वंदना यांच्याशी झटापट केली. तसेच सरदार याने वंदना यांचे पती संजय यांनाही मारहाण केली. मुलगा रितेश याला युवराज याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे वंदना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सरदार पोवार, युवराज खाडे, राजाराम पोवार यांची पत्नी, पिंकी पोवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.
--------------

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर ः शेतीच्या बांधावरून मंगळवारी (ता.७) कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथे झालेल्या वादातून दोघांना मारहाण झाली.
संशयित आरोपी संभाजी पवार- हुजरे (वय ५२), धनाजी पवार- हुजरे (५०), भरत पवार- हुजरे (४३), अमृत पवार- हुजरे (२४, सर्व रा. उलपे गल्ली, कसबा बावडा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व संशयित आरोपी यांची गोळीबार मैदान येथे शेती आहे. शेतीच्या बांधावरून दोघांत वाद आहेत. मंगळवारी सकाळी पुन्हा हा वाद होऊन संशयित संभाजी पवार- हुजरे,धनाजी पवार-हुजरे ,भरत पवार-हुजरे, अमृत पवार-हुजरे यांनी फिर्यादी नितीन पारखे व त्याच्या भावाला विळा,काठी व दगडाने मारहाण केली. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------
बालिंगा पाडळी येथे पैशाच्या वादातून मारहाण
कोल्हापूर ः बालिंगा पाडळी (ता.करवीर) येथे मंगळवारी (ता.७) पैशाच्या वादातून एकास मारहाण झाली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी हेमचंद्र अशोक पवार याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की हेमचंद्र पवार यांनी पैशाच्या कारणावरून फिर्यादी प्रकाश रामचंद्र पवार यांना दमदाटी व शिवीगाळ करून डोक्यात खुर्ची मारून जखमी केले. याबाबत प्रकाश पवार यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी हेमचंद्र पवारवर गुन्हा दाखल झाला.
...

जुन्या वादातून एकास स्मशानभूमीत मारहाण

कोल्हापूर ः जुन्या वादातून पंचगंगा स्मशानभूमीत एकास मारहाण झाली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार
संशयित आरोपी सिद्धांत शरद ढाले (वय ३५, रा.फिरंगाई तालीम जवळ), दोन मेहुणे व सासरा (नावे समजली नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी शैलेंद्र कदम यांची आई शकुंतला कदम व संशयित आरोपी सिद्धांतची आजी मालुबाई ढाले यांच्यात चार दिवसांपूर्वी घरासमोर मोटारसायकल पार्किंग करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी तो वाद मिटला होता. सोमवारी (ता.६) रात्री साडेअकराच्या सुमारास शैलेंद्र हे शेजारी राहणाऱ्या साताबाई ठाणेकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेले होते. तेथे सिद्धांत याने शैलेंद्रला, माझ्या आजीसोबत तुझी आई का भांडत होती, असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याने दोन मेहुणे आणि सासरा यांनाही बोलावून घेवून काठीने मारहाण केली.
...

बसथांब्यावर पर्स चोरली

कोल्हापूर ः शिवाजी पुतळा ते कोंडाओळ येथील बसथांब्यावर चोरट्याने पर्स चोरल्याची घटना मंगळवारी (ता.७) दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद शुभा अरुणचंद्र दीक्षित यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पर्समध्ये रोख सतराशे रुपये, मोबाईल हॅण्डसेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड व वडिलांचे आधार कार्ड असा १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.