प्रस्तावांच्या खेळात अडकली सदनिकांची दुरुस्ती

प्रस्तावांच्या खेळात अडकली सदनिकांची दुरुस्ती

ich86.jpg
87767
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाच्या सदनिकांची दूरवस्था झाली आहे.
---------
प्रस्तावांच्या खेळात अडकली सदनिकांची दुरुस्ती
आयजीएम रुग्णालय; जागेबाबत तांत्रिक अडचण तर नव्याने बांधकामाचा तज्ज्ञांचा अहवाल
---------------
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ८ : आयजीएम रुग्णालय सदनिका दुरूस्तीचे काम सुरू होण्याआधीच अडचणीत सापडले आहे. सदनिका पाडून नव्याने बांधाव्या लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आल्याने नवीन प्रस्ताव देणे आवश्यक बनले आहे. तसेच सदनिकांच्या जागेबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानेही काम रेंगाळले आहे. मार्च २०२० मध्ये रुग्णालय इमारत व सदनिका दुरूस्तीसाठी १८ कोटी २७ लाख रुपये निधी मंजूर केला होता. यामध्ये सदनिकांसाठी ४ कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर केला होता. मात्र पुन्हा प्रस्तावांच्या खेळात सदनिकांची दुरूस्ती सापडल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी उमटत आहे.
१९८७-८९ मध्ये इचलकरंजी नगरपालिकेने शहराच्या मध्यवस्तीत आयजीएम रुग्णालयाची उभारणी केली होती. रुग्णालयाची इमारत व त्याच्यासमोर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी सदनिका असे एकूण ७.१२ एकर जागेमध्ये इमारती उभारल्या होत्या. रुग्णालयालगतच सदनिका असल्याने कर्मचाऱ्‍यांना रुग्णांना जलद सेवा देणे सोयीस्कर होत होते. सदनिका प्रत्येकी तीन मजली असून अशा चार इमारती बांधल्या आहेत. यातील एका इमारतीमध्ये १२ कुटुंब असे एकूण ४८ कुटुंब राहतील इतकी क्षमता आहे. मात्र पालिकेने इमारतींच्या दुरूस्तीकडे लक्ष न दिल्याने त्या आज धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. इमारतींची अवस्था अत्यंत खराब झाल्याने ढपले निघाली आहेत. ड्रेनेज, पाईपलाईन, विद्युतवाहिन्या यांना दुरुस्तीची गरज होती. त्यामुळे या इमारतींचा दुरूस्ती प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला होता. त्यानुसार २०१७ व २०१९ मध्ये एजन्सीमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यामध्येही इमारतींची अवस्था अत्यंत खराब झाल्याचा अहवाल दिला होता. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या इमारती बांधण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी जागेचा सातबारा, नकाशा मागवला आहे. मात्र अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप त्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे सदनिकांच्या बांधकामसाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथे वास्तव्यास असणारे कर्मचारी इमारतींच्या दुरवस्था पाहून खासगी जागेत स्थलांतरीत होत आहेत.
--------------
प्रथम इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र इमारतींची दुरवस्था पाहून नव्याने बांधण्याची आवश्यक्ता होती. त्याकरीता नव्या प्रस्तावाची गरज आहे.
-सतीश शिंदे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com