जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लेखा परीक्षणाचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 
लेखा परीक्षणाचे आदेश
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लेखा परीक्षणाचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लेखा परीक्षणाचे आदेश

sakal_logo
By

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या
लेखा परीक्षणाचे आदेश
सोमय्यांच्या तक्रारीची दखल; छत्रीकर यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्जपुरवठ्यावरून जिल्हा बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी जिल्हा बँकेविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. या चौकशीसाठी विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) डी. टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि ब्रिक्स फॅसिलिटीज प्रा. लि. या कंपन्यांना दिलेल्या कर्जाबाबत सोमय्या यांनी या संदर्भातील पाठविलेल्या आदेश पत्रात विभागीय सहनिबंधकांनी म्हटले आहे, की सहनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या कर्ज प्रकरणातील आर्थिक व्यवहाराबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवले होते. याबाबत सहनिबंधक कार्यालयाने जिल्हा बँकेकडून लेखापरीक्षण अहवाल व अन्य अहवाल मागवला होता. जिल्हा उपनिबंधकांनी प्रत्यक्ष बँकेस भेट देऊन याची शहानिशा केली होती. नाबार्ड तपासणी अहवाल, वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची तपासणी करण्यात आली होती. यातून काही बाबी समोर आल्या. यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने झालेले मुद्दे नाबार्ड आणि वैधानिक लेखापरीक्षणाच्या अहवालात नाहीत. संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स कंपनी यांना दिलेल्या कर्जाबद्दलचा पुरेसा तपशील लेखापरीक्षण आणि नाबार्ड अहवाल यामध्ये नाही. ३९ हजार ५३ शेतकऱ्यांच्या नावाने प्रत्येकी १० हजार मुदत ठेव याबाबतही लेखापरीक्षकांनी पुरेसा ऊहापोह केल्याचे दिसत नाही. या सर्व गोष्टींची चौकशी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चाचणी लेखापरीक्षण होणार आहे.

या मुद्यांची होणार तपासणी
१. सरसेनापती साखर कारखान्यास बँकेने वेळोवेळी दिलेल्या सर्व प्रकारच्या कर्जाची तपासणी
२. कर्ज मागणी, कर्ज देण्याची कारणे, कर्जासंबंधी संचालक मंडळाचा ठराव या सर्व बाबींची तपासणी
३. कर्ज वितरण करताना कर्जमर्यादेचे उल्लंघन झाले आहे काय? तारण मालमत्तेचा आणि परतफेडीचा तपशील, कर्ज रकमेचा विनियोग यासह अन्य बाबी.
४) ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्जाचीही तपासणी, कर्ज मागणी, कर्ज, कर्जाची कारणे यासाठीचे संचालक मंडळाचे ठराव, कर्जाचा विनियोग, तारण मालमत्तांचे तपशील
५) दोन्ही कर्ज प्रकरणांचा बँकेचे संचालक, अध्यक्ष हसन मुश्रीफांशी संबध किंवा सहसंबंध आहे का?
६) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आणि बँकेसाठी सहसंबंधाची तपासणी.
७) ३९०५३ शेतकऱ्यांच्या नावाने प्रत्येकी १० हजार मुदतठेव ठेवली आहे का? मुदतठेवीचा हसन मुश्रीफ, ब्रिक्स कंपनी, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना यांच्याशी संबंध आहे का? या कारखान्यास ४० कोटींचे कर्ज दिले आहे का?