यिन महिला दिन

यिन महिला दिन

लोगो - यिन

87784

‘यिन’च्या युवतींचा
अनोखा महिला दिन

कोल्हापूर, ता. ८ ः ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या युवतींनी अनोखा महिला दिन झाला. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिराजवळ कष्टकरी महिलांसोबत वेळ घालवत महिला दिनाचा आनंद द्विगुणित केला.
मंदिर परिसरातील चप्पल स्टँडजवळ काम करणाऱ्या महिला, फूलविक्री करणाऱ्या महिला तसेच येथील अंध महिलांना गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन त्यांचा दिवस खास बनवला. या महिलांचा महिला दिन म्हणजे रोजच्या सारखाच. विशेष काही सोहळा नाही. समोर असलेले काम करण्यात त्या गुंग होत्या. त्यांच्यासोबत एक तासाभराचा वेळ घालवून तुम्हीही आमच्यासाठी विशेष आहात, याची जाणीव या युवतींनी करून दिली. यिन जिल्हा कार्याध्यक्ष राजलक्ष्मी कदम, तानिया मुसल, प्रिया परमाणी, सई साळोखे, श्रृती कदम, तिर्था मोळे, दुर्वा सावंत, हर्षदा कदम, शिवानी नागराळे उपस्थित होत्या. यिनचे सहाय्यक व्यवस्थापक अवधुत गायकवाड यांनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com