‘एलएलएम’ च्या विद्यार्थ्याचे आंदोलन स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एलएलएम’ च्या विद्यार्थ्याचे आंदोलन स्थगित
‘एलएलएम’ च्या विद्यार्थ्याचे आंदोलन स्थगित

‘एलएलएम’ च्या विद्यार्थ्याचे आंदोलन स्थगित

sakal_logo
By

‘एलएलएम’ च्या विद्यार्थ्याचे आंदोलन स्थगित

कोल्हापूर, ता. ८ ः शिस्तभंगाची कारवाई म्हणून शिवाजी विद्यापीठाने बेकायदेशीरपणे तडकाफडकी निर्णय घेवून प्रवेश रद्द केला असल्याचे सांगत अभिजित खोत या विद्यार्थ्याचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू होते. प्रवेश रद्दचा निर्णय मागे घेत असल्याचे पत्र या विद्यार्थ्याला विद्यापीठ प्रशासन आणि विधी अधिविभागाकडून आज रात्री मिळाले. त्यामुळे या विद्यार्थ्याने आंदोलन स्थगित केले.
याबाबत अभिजित याने सांगितले की, शिस्तभंगाची कारवाई म्हणून विद्यापीठाने माझा प्रवेश रद्द केला होता. प्रवेश कायम ठेवण्यासह १६ मार्चपासून होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी, या मागणीसाठी सोमवारपासून मी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात उपोषण सुरू केले. मागणीची पूर्तता करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा मी आज दिला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश रद्दचा निर्णय मागे घेतल्याचे पत्र मला दिले. मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करत आहे.