धैर्यशील माने यांची गाडी रोखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धैर्यशील माने यांची गाडी रोखली
धैर्यशील माने यांची गाडी रोखली

धैर्यशील माने यांची गाडी रोखली

sakal_logo
By

03321
चंदूर ः खासदार धैर्यशील माने यांची गाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रोखूत जाब विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाजूला घेतले.

धैर्यशील माने यांची गाडी रोखली
चंदूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ८ ः शिवसेनेतील ठाकरे गटातील संतप्त कार्यकर्त्यांच्या रोषाला आज खासदार धैर्यशील माने यांना सामोरे जावे लागले. ठाकरे गटाशी फारकत घेतल्यामुळे त्यांची गाडी चंदूर (ता. हातकणंगले) येथे रोखण्यात आली. आम्ही जीवाचे रान करून तुम्हाला निवडून दिले; मग तुम्ही ठाकरेंशी गद्दारी का केली, असा संतप्त सवाल या कार्यकर्त्यांनी विचारला. यावेळी शिंदे व ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यामुळे वातावरण तापले; पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर माने यांची गाडी सुरक्षितपणे पुढे मार्गस्थ झाली.
सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेतील शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय हातकणंगले मतदारसंघाचे खासदार माने यांनी घेतला. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेबाबत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना आहेत. त्याचे पडसाद आज चंदूरमध्ये दिसून आले. शाहूनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी माने आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रोखून धरली. शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे की जय, अशा घोषणा दिल्या. माने यांनी गाडीतून उतरून कार्यकर्त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्ही गद्दारी का केली, असा संतप्त सवाल करीत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे शिंदे व ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. याची माहिती मिळताच पोलिस तातडीने दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. त्यानंतर माने यांची गाडी पुढे मार्गस्थ झाली. याची शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

विकासकामांवर लक्ष केंद्रित
या प्रकारामुळे मी विचलीत होणार नाही. माझे लक्ष मतदारसंघातील विकासकामांवर आहे. माझ्यासंदर्भातील निर्माण केलेला गैरसमज दूर करू, अशी प्रतिक्रिया खासदार माने यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘काही तरुणांनी माझी गाडी अडवली. त्यांना कोणाचा तरी आदेश आला असेल. गाडीतून उतरुन मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी गोंधळाचा प्रयत्न केला. राजकीय बदल होत असतात. पण अशा प्रकारे विरोध करण्याची प्रथा जिल्ह्यात नाही. मतभेद झाले तरी मनभेद होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. या तरुणांचे माझ्या विजयात योगदान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नका, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करू नका, असे आवाहनही कार्यकर्त्यांना केले आहे.’’