
स्तन कर्करोग
सीपीआरमध्ये स्तन कर्करोगविषयक कक्ष सुरू
कोल्हापूर, ता. ८ ः महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण राज्यभरात १९ टक्क्यांवर गेंले आहे. त्यामुळे स्तनातील कोणतीही गाठ असो तातडीनी वैद्यकीय तज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. वेळीच निदान व उपचारातून गंभीर धोका टाळता येणे शक्य आहे याची जागृती करणारा स्तनांच्या कर्करोगा विषयी मार्गदर्शन कक्ष सिपीआर रूग्णालयात आजपासून सुरू झाला आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घघाटन करण्यात आले. या कक्षाच्या प्रमुख डॉ. प्रिया होंबाळकर म्हणाल्या की, ‘‘ महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोग विषयी समज गैरसमज आहे ते दूरू करण्यासाठी महिलांचे समुपदेशन करणे, गरजेनुसार कर्करोग तपासणी व उपचार किंवा शस्त्रक्रिया करणे अशा सुविधा सीपीआरच्या विशेष कक्षात देण्यात येणार आहेत. आठवड्यातून एक दिवस हा कक्ष केवळ महिलांसाठी तपासणी व बाह्यरूग्ण विभागाची सेवा देईल. कर्करोग विषयी समुपदेशन रेडिओथेरपि, स्त्री रोग विभाग विकृतीशास्त्र विभाग, क्ष किरण विभाग जनऔषधी विभाग, भौतिकोपचार विभाग यांच्या सहकार्याने हा कक्ष चालविण्यात येणार आहे. कर्करोगाचे प्राथमीक आवस्थेत निदान व्हावे यासाठी मॅमोग्राफी व अध्यायावत उपकरणे ही लवकर उपलब्ध होणार आहेत. त्यातून महिलांचे स्तनाचा कर्करोगाचे निदान व उपचार करणे ही सुलभ होणार आहे.’’
महिला मध्ये होणार जागृती
महिलांचा स्तनांचा कर्करोग त्यावर तपासणी, उपचार या संबधीत महिलांमध्ये या कक्षा मार्फत जागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या क्षेत्रात महिला जास्त संख्येने कार्यरत आहेत तिथे जावून महिलां युवतीशी संवाद साधला जाणार आहे. असेही डॉ. प्रिया यांनी सांगितले.