
देसाई हॉस्पिटलतर्फे मडिलगेत आरोग्य शिबीर
gad91.jpg
87837
मडिलगे : देसाई हॉस्पिटल व ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या आरोग्य शिबिरात रुग्णाची तपासणी करताना डॉ. रोहित देसाई.
---------------------------
देसाई हॉस्पिटलतर्फे मडिलगेत आरोग्य शिबिर
गडहिंग्लज, ता. १० : येथील देसाई हॉस्पिटल आणि मडिलगे (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य तपासणी शिबिर झाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत झालेल्या या शिबिरात ८१ रुग्णांची तपासणी केली. हृदयरोग, मूत्ररोग, नेत्ररोगासह विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी केली. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, कार्डिओलॉजिस्ट डॉ. रोहित देसाई, यूरॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. दिशा राणे-देसाई यांनी रुग्णांची तपासणी केली. डॉ. बाजीराव पाटील, डॉ. आनंदा कांबळे, डॉ. शीतल हरमळकर, डॉ. संदीप देशपांडे यांचे सहकार्य मिळाले. सरपंच बापू निउंगरे, उपसरपंच सुशांत गुरव, मनसेचे तालुका उपाध्यक्ष अजित निउंगरे उपस्थित होते.