गडहिंग्लज पाणी योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळवून द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज पाणी योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळवून द्या
गडहिंग्लज पाणी योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळवून द्या

गडहिंग्लज पाणी योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळवून द्या

sakal_logo
By

87853
गडहिंग्लज : पाणी योजनेला प्रशासकीय मान्यतेच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना दिले.

गडहिंग्लज पाणी योजनेला
प्रशासकीय मंजुरी मिळवून द्या
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी; आमदार मुश्रीफ यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शहरातील काही भागासह हद्दवाढीतील नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी पालिकेने अमृत योजनेंतर्गत ४६ कोटीच्या पाणी योजनेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला आहे. पाठपुरावा करून ही मान्यता तत्काळ मिळवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. चार जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, ६५ किलोमीटरची जलवाहिनी समाविष्ट असलेल्या ४६ कोटी ६१ लाख खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव पालिकेने तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविला होता. त्याला १५ नोव्हेंबर २०२२ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पुढील ३५ वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन या पाणी योजनेचा प्रस्ताव तयार केला आहे. अस्तित्वातील नळ योजनेच्या जलवाहिन्यांसह हद्दवाढ क्षेत्रातील उपनगरांसाठीही नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर पालिकेची ही योजना स्वीकारली आहे. सध्या हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पालिकेने प्रधान सचिवांकडे सादर केला आहे. सध्या हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी आहे. योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या योजनेमुळे हद्दवाढीसह शहरात येणाऱ्या नागरिकांना शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा होणार आहे. याची दखल घेऊन तत्काळ योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळवून द्यावी. हारुण सय्यद, किरण कदम, रश्मीराज देसाई, महेश सलवादे, महेश देवगोंडा, अमर मांगले, उदय परीट, रियाज जमादर, सुरेश कोळकी, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, बाळासाहेब घुगरे, मुरली कांबळे, अरुण बेल्लद आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.