मुंबईत घर आमच्या हक्काचे...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत घर आमच्या हक्काचे...!
मुंबईत घर आमच्या हक्काचे...!

मुंबईत घर आमच्या हक्काचे...!

sakal_logo
By

gad95.jpg
87857
गडहिंग्लज : मुंबईत घर मिळावे या मागणीसाठी गिरणी कामगारांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
-------------------------------
मुंबईत घर आमच्या हक्काचे...!
गिरणी कामगारांनी मोर्चाद्वारे ठणकावले; प्रांत कार्यालयासमोर दिवसभर धरणे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : मुंबईत घरासाठी गिरणी कामगार व वारसदारांचा लढा सुरूच आहे. त्यांनी आज येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत घर आमच्या हक्काचे असल्याचे ठणकावले. प्रांत कार्यालयासमोरच ठिय्या मारत दिवसभर धरणे धरली. सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
येथील राम मंदिरात गडहिंग्लज तालुक्यातील गिरणी कामगार जमले. तेथून दुपारी साडेबाराला मोर्चाला सुरुवात झाली. मुंबईत घर आमच्या हक्काचे..., मोफत घर मिळालेच पाहिजे..., कोण म्हणतंय देत नाही... आदी घोषणा दिल्या. आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या दारातच ठिय्या मारत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. अमृत कोकितकर, पद्मिनी पिळणकर, विठ्ठल कदम, धोंडिबा कुंभार, बाळाराम सुपले, शिवाजी कुराडे यांची भाषणे झाली.
गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. रामजी देसाई, बंडू शिंदे, केरबा पाटील, अर्जुन पाटील, लक्ष्मण बेळी, पांडुरंग शिंदे, जयसिंग कुंभार, कल्पना नाईक, लक्ष्मीकांत नाईक, धोंडिबा कुंभार, सोनाबाई नाईक, मारुती पाटील, गुंडाबाई नाईक यांच्यासह गिरणी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
------------------------------
चंदगडला तहसील कार्यालयावर मोर्चा
चंदगड ः मुंबईतील गिरणी कामगारांना तेथेच घरे मिळायला हवी या आग्रही मागणीसाठी सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाने तालुक्यातील गिरणी कामगारांनी आज येथे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला. तहसिलदार विनोद रणावरे यांना निवेदन दिले.
रवळनाथ मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. मुंबईत घरे मिळायलाच हवी, घर आमच्या हक्काचे अशा घोषणा देत मोर्चा नवीन वसाहत मार्गे तहसील कार्यालयावर आला. गोपाळ गावडे, हणमंत खामकर, कृष्णा मुळीक, कृष्णा खोराटे, आणाप्पा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.