शिवराज विद्या संकुलातर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज विद्या संकुलातर्फे सत्कार
शिवराज विद्या संकुलातर्फे सत्कार

शिवराज विद्या संकुलातर्फे सत्कार

sakal_logo
By

gad97.jpg
87921
गडहिंग्लज : शिवराज विद्या संकुलातर्फे विविध पदावर निवड झालेल्या शिक्षक व सेवकांच्या सत्कारप्रसंगी डॉ. अनिल कुराडे, प्रा. सुधीर मुंज, संदीप कुराडे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------
शिवराज विद्या संकुलातर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : येथील शिवराज विद्या संकुलामध्ये विविध पदांवर निवड झालेल्या व पुरस्कारप्राप्त शिक्षक व कर्मचाऱ्‍यांचा सत्कार केला. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे अध्यक्षस्थानी होते.
शिव-शाहू सेवक पतसंस्थेचे नूतन संचालक डॉ. महेश चौगुले, प्रा. रोशन पाटील, उत्तम राऊत, मुगळीच्या लक्ष्मी पतसंस्थेचे नूतन संचालक प्रा. विक्रम शिंदे, शिवशाहू पतसंस्थेच्या बिनविरोधसाठी सहकार्य केल्याबद्दल कार्यालयीन लिपीक राजू जाधव, समाजरत्न पुरस्कार प्राप्त ग्रंथालय कर्मचारी अनिल कलकुटकी आदींचा सत्कार केला. प्राचार्य कदम, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अशोक मोरमारे यांनी स्वागत केले. डॉ. कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. कदम यांनी महाविद्यालयातील प्रत्येक घटकाने सामाजिकता जपली पाहिजे, असे सांगितले. पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज, डॉ. महेश चौगुले, प्रा. विक्रम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, शिवराज स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आझाद पटेल यांनी आभार मानले.