नुलच्या श्री सुरगीश्वर मठात संयुक्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुलच्या श्री सुरगीश्वर मठात संयुक्त कार्यक्रम
नुलच्या श्री सुरगीश्वर मठात संयुक्त कार्यक्रम

नुलच्या श्री सुरगीश्वर मठात संयुक्त कार्यक्रम

sakal_logo
By

GAD98.JPG
87922
नूल : सुरगेश्वरा शिवाचार्य स्वामी यांचा सत्कार गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी केला. यावेळी सुरगीश्वर सेवा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
नूलच्या श्री सुरगीश्वर
मठात संयुक्त कार्यक्रम
नूल, ता. ९ : नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठात शहापूर (जि. गुलबर्गा) मठाचे मठाधिपती सुरगेश्वरा शिवाचार्य स्वामी यांचे प्रवचन झाले. मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी अध्यक्षस्थानी होते. मीटिंग हॉलचे उद्‍घाटनही स्वामींच्या हस्ते झाले.
सुरगेश्वरा स्वामी म्हणाले, ‘माणसाने सेवाभाव वृत्ती जोपासावी. फळाची अपेक्षा न ठेवता सेवा कर्म केल्यास चांगले यश मिळते.’ सुरगीश्वर सेवा संघटनेतर्फे स्वामींचा गुरुसिद्धेश्वर स्वामींच्या हस्ते सत्कार झाला. संजय मुत्नाळे, बाबुराव चौगुले, युवराज देसाई, काशिनाथ व्हंजी, अजित पाटील आदी उपस्थित होते. बसवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. आण्णागोंडा पाटील यांनी आभार मानले.