Sun, May 28, 2023

‘इचलकरंजी मर्चंट्स’ अध्यक्षपदी पाटील
‘इचलकरंजी मर्चंट्स’ अध्यक्षपदी पाटील
Published on : 12 March 2023, 11:09 am
87936
-------------
‘इचलकरंजी मर्चंट्स’ अध्यक्षपदी पाटील
इचलकरंजी ः येथील दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नूतन संचालकांची सभा तालुका उपनिबंधक डॉ. प्रगती बागल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये अध्यक्षपदी राजगोंडा पाटील, तर उपाध्यक्षपदी गजानन लोंढे यांची एकमताने निवड केली. विलास गाताडे, चंद्रकात बिंदगे, कमलाकर पालनकर, बाळासाहेब बरगाले, भूषण शहा, राजेंद्र शिरगुप्पे, राजकुमार पाटील, मधुकर पांढरे, दशरथ मोहिते, व्यंकटेश शहापूरकर, श्रीमती शोभा कडतारे, विजयश्री गौड, सरव्यवस्थापक दीपक काटकर उपस्थित होते. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांसह संचालकांचा सत्कार केला.