वसुंधरा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसुंधरा महोत्सव
वसुंधरा महोत्सव

वसुंधरा महोत्सव

sakal_logo
By

87973

किर्लोस्कर चित्रपट महोत्सवातून
समाज विकासास चालना ः डॉ. रथ
कोल्हापूर, ता. ९ ः किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समाजविकासास चालना देणारा ठरणार आहे. अशा महोत्सवातून विविध विषयांची मांडणी केली जात आहे, असे प्रतिपादन सायबरचे संचालक डॉ. एस. पी. रथ यांनी केले. किर्लोस्कर उद्योग समूह व सायबर महाविद्यालयात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.
किर्लोस्कर कंपनीचे प्लाँट हेड चंद्रहास रानडे म्हणाले, ‘‘नावीण्यपूर्ण उपक्रमांमुळे किर्लोस्कर समूहाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे.’’
फेस्टिव्‍हलचे समन्वयक विरेंद्र चित्राव यांनी सकस अन्न, समृद्ध निसर्ग व आरोग्यपूर्ण समाज यावर विविध चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार असल्याचे सांगितले. किर्लोस्कर कंपनीचे मानवसंसाधन अधिकारी धीरज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद आजगेकर यांनी केले. डॉ. दिपक भोसले यांनी आभार मानले. उदघाटन सत्रानंतर टिंबक्टु, हंटीग फॉर सिडस, टर्टल्स विथ अँटेना, इंडियाज वॉटर चँलेंज, नो टु ओरगॅनिक, येस टू नॅचरल फार्मिंग या शॉर्टफिल्मस दाखविल्या. दुपारच्या सत्रात स्वप्नील कुलकर्णी व सौरभ मराठे यांनी ई वेस्ट व प्लास्टिक इंधनाच्या वापरातून उद्योगउभारणीवर मार्गदर्शन केले.
---------
आज महोत्सवात
सकाळी दहा नंतर ः विविध शॉर्टफिल्म्सचे सादरीकरण
दुपारी दोन वाजता ः शाश्वत शेती या विषयावर नरेंद्र खोत यांचे व्याख्यान
-----
चौकट
इकोबाजारचे उद्‍घाटन
किर्लोस्कर ऑईल इंजिन्स व डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त तृणधान्य व पर्यावरणपूरक वस्तुंच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे प्लांट हेड सी. जी. रानडे, व्यवस्थापक धीरज जाधव, सीएसआर हेड शरद आजगेकर, विरेंद्र चित्राव, सुवर्णा भांबुरकर, प्रा. डॉ. एस. पी. रथ यांच्या हस्ते झाले. स्वयंसिद्धाच्या हॉलमध्ये भरलेल्या इकोबाजारमध्ये विविध पर्यावरणपूरक वस्तू पहायला मिळणार आहेत. विश्वस्त जयश्री गायकवाड, अध्यक्षा सौम्या तिरोडकर, कार्यकारी संचालिका तृप्ती पुरेकर आदी उपस्थित होत्या. हे प्रदर्शन शुक्रवारपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.