पेद्रेवाडीत आज केदारी रेडेकर स्मृतिदिन कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेद्रेवाडीत आज केदारी रेडेकर स्मृतिदिन कार्यक्रम
पेद्रेवाडीत आज केदारी रेडेकर स्मृतिदिन कार्यक्रम

पेद्रेवाडीत आज केदारी रेडेकर स्मृतिदिन कार्यक्रम

sakal_logo
By

पेद्रेवाडीत आज केदारी
रेडेकर स्मृतिदिन कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ : मुंबई महापालिकेचे तत्कालिन नगरसेवक व कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख यांचा उद्या (ता. १०) २५ वा स्मृतिदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या गावी पेद्रेवाडी (ता. आजरा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती असून माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे अध्यक्षस्थानी असतील. सकाळी आठला प्रतिमा पूजन, मिरवणूक व पेडणेकर यांच्याहस्ते स्मरणिका प्रकाशन होईल. यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याहस्ते फार्मर्स पॅकेज पॉलिसीचे वाटप होणार आहे. दरम्यान, केदारी रेडेकर हायस्कूलचा रौप्यमहोत्सवी सोहळाही होणार आहे.
पेद्रेवाडीच्या सामान्य शेतकरी कुटुंबातील केदारी रेडेकर गोदरेज कंपनीत नोकरीला होते. तेथे भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. वेगवेगळ्या आंदोलनातून सक्रीय सहभागामुळे ते शिवसेनेशी जोडले गेले. त्यांची शिवसेनेप्रती असलेली निष्ठा लक्षात घेवून त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर रेडेकरांनी जिल्ह्यात झंजावात तयार करून शिवसेनेचा विचार घरोघरी पोहचवला. या पदावरील यशस्वी कारकिर्दीनंतर त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्यात त्यांनी मोठ्या मतांनी विजय मिळवला. राजकीय गुरू लिलाधर डाके यांच्या मार्गदर्शनाने त्यांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. शिवसैनिकांशी ते कुटुंबातील घटकाप्रमाणे वागत असत. आजरा साखर कारखाना उभारणीतही त्यांचे योगदान राहिले. राजकीय व सामाजिक कार्य फुलत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी गोकुळच्या संचालिका तथा रेडेकर शिक्षण समूहाच्या अध्यक्षा श्रीमती अंजना रेडेकर, चिरंजिव व संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर त्यांचे कार्य जोमाने पुढे नेते आहेत.