क्षयरोग दत्तक

क्षयरोग दत्तक

88030
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निक्षय पोषण योजने अंतर्गत दत्तक रूग्णांसाठी फुड बास्केट दिले. या वेळी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, नवोदिता घाटगे आदी.


मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून
१०० क्षयरुग्णांना फुड बास्केट
सहा महिने कालावधीसाठी घेतले दत्तक
कोल्हापूर, ता. ९ : गरीब, गरजू असलेल्या १०० क्षयरुग्णांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निक्षय पोषण योजने अंतर्गत फुड बास्केट स्वरुपात सहा महिने कालावधीकरीता दत्तक घेतले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेणे शक्य होत नाही. कर्त्या व्यक्तीस क्षयरोग झाल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अशा रुग्णांसाठी स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, कंपन्या, दानशूर व्यक्ती, गणेश मंडळे यांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १०० क्षयरुग्ण दत्तक घेतले.
या फुड बास्केट किटचा वाटपाचा कार्यक्रम दौलत नगर येथे तीनबत्ती चार रस्ता चौक येथे मंत्री पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, नवोदिता घाटगे, राहुल चिकोडे, महेश जाधव, अशोक देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शहर क्षयरोग अधिकारी डॉ.रुपाली दळवी, डॉ. अमरसिंह पोवार, डॉ. आदित्य काशिद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरात अजूनही २०० च्या वर क्षयरुग्ण पोषण आहाराच्या प्रतिक्षेत आहेत. स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात देऊन क्षयरोग उच्चाटनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी केले. शहर क्षयरोग नियंत्रण कार्यालय, ईगल प्राईड बिल्डींग, मिरजकर तिकटी येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com