डीएम अभ्यासक्रमास मान्यता

डीएम अभ्यासक्रमास मान्यता

सीपीआर लोगो
---
सीपीआर रूग्णालयात
‘डीएम कार्डीयालॉजी’स मान्यता
कोल्हापूर , ता. ९ ः हृदयशस्त्रक्रिया विषयातील डीएम कार्डीयालॉजी (सुपरस्पेशालीटी) याविषयाच्या उच्च शिक्षण देण्यासाठी सीपीआर रूग्णालयाच्या हृदयशस्त्रक्रिया विभागास मान्यता मिळाली आहे. देशात मोजक्याच ठिकाणी मोजक्याच जागांना मान्यता आहे. त्या यादीत सीपीआर रूग्णालयाचाही समावेश झाला. परिणामी कार्डीयालॉजीचे उच्चशिक्षण देण्यात सीपीआरचे नाव देशाच्या नकाशावर आले आहे. यातून सीपीआरमधील हृदयविकार उपचार सेवेला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण एमबीबीएसची नियमीत पदवी घेतल्यानंतर एमडी उच्च शिक्षण घेतले जाते. त्यानंतर डीएमचे उच्च शिक्षण घेता येते. त्यासाठी विषयाची शाखा निवडावी लागते. डीएम अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी देशस्तरावर प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना डीएमला प्रवेश मिळतो. त्यासाठी शासकीयस्तरावर डीएम कार्डीयालॉजीचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालय, नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा दोनच ठिकाणी मान्यता आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास हा मान मिळाला आहे.
डीएमसाठी शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे एकूण २३ जागा आहेत. यातील तीन जागा कोल्हापूरसाठी मिळाल्या आहेत. त्यानुसार येथील हृदय शस्त्रक्रिया विभागात आणखी तीन एमडी डॉक्टर्स उपचार सेवेत येऊ शकतात. कार्डीयाकचे सुपर स्पेशालीटीचे शिक्षण घेण्यासोबत उपचारसेवेतही मदत होणार आहेत. त्यामुळे हृदयशस्त्रक्रिया विभागातील उपचार सेवेला गती मिळणार आहे. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित तसेच डॉ. अक्षय बाफना, डॉ. अनिता सैबन्नावर ,डॉ. विदुर यांच्यासह प्रशासकीय विभागाने या मान्यतेसाठी पाठपुरावा केला होता.
डीएमचे उच्चशिक्षण घेण्याची सुविधा खासगी वैद्यकीय महाविद्यालयाकडेही आहे. मात्र, त्याचे शुल्क काही लाखात आहे. तो खर्च न परवडणाऱ्या वर्गाला शासकीयस्तरावर सवलतींचे शुल्क हा अभ्यासक्रम शिकता येतो. मात्र, मोजक्याच जागा असल्याने मोजकेच डॉक्टर्स तयार होतात. सीपीआरच्या तीन जागा उपलब्ध झाल्याने कार्डीयालॉजीचे तीन सुपर स्पेशालीटी डॉक्टर्स तयार होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com