
इ कार्ड नोंदणी
जन आरोग्य योजना अंतर्गत
ई-कार्ड नोंदणी शनिवारपासून
कोल्हापूर, ता. ९ : शहरातील पात्र नागरिकांची आयुष्यमान-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत ई-कार्ड नोंदणी शनिवारपासून (ता. ११) २० मार्च कालावधीत करण्यात यणार आहे.
ही आरोग्य विमा योजना राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्र सुरू करण्यात आली आहे. विमा आणि हमी तत्वावर राबविण्यात येत असून एकत्रिक योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबापैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना २०११ च्या यादीनुसार पात्र होतात. या लाभार्थ्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रेशन कार्डचे दिड लाख व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत साडेतीन लाख असा ५ लाखांचा आरोग्य विमा मोफत मिळतो. महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर शनिवारपासून विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग निहाय पात्र लाभार्थांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.