तुकाराम बीजनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुकाराम बीजनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू
तुकाराम बीजनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू

तुकाराम बीजनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरू

sakal_logo
By

तुकाराम बीजनिमित्त
धार्मिक कार्यक्रम सुरू
कोल्हापूर : तुकाराम बीजनिमित्त आज जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्‍वरी पारायण व अखंड हरिनाम सोहळ्याला प्रारंभ झाला. सलग सात दिवस पारायणाबरोबरच कीर्तन, प्रवचन, भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, शाळांतही आज विविध उपक्रम झाले. संत विचारांचा जागर यानिमित्ताने झाला. तुकाराम बीजनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांबरोबरच जिल्ह्यातही पारायण सोहळ्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. सकाळी पारायण आणि सायंकाळी विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम, कीर्तन, प्रवचने असा माहौल आता सर्वत्र अनुभवायला मिळणार आहे.