
‘लॉ’ अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे अर्ज आजपासून भरा
‘लॉ’ अभ्यासक्रम परीक्षा अर्ज प्रकिया आजपासून
कोल्हापूर ः विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या (तीन आणि पाच वर्षीय) सत्र तीनच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाकडून उद्या, शुक्रवारपासून सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या हिवाळी सत्रातील परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होतील. त्यासाठी विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी विनाविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २३ मार्चपर्यंत आहे. त्यानंतर महाविद्यालय, अधिविभागांनी विद्यापीठात परीक्षा अर्जांच्या याद्या सादर करण्याची मुदत २७ मार्चपर्यंत आहे. दरम्यान, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टीचर ट्रेनिंग एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन एज्युकेशन या अभ्यासक्रमांच्या एकूण ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा आज दिली. बी. व्होक. फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट, एम. एस्सी. बॉटनी या अभ्यासक्रमाचे निकाल परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले.