प्रजापिता ब्रम्हाकुमारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रजापिता ब्रम्हाकुमारी
प्रजापिता ब्रम्हाकुमारी

प्रजापिता ब्रम्हाकुमारी

sakal_logo
By

88048
कोल्हापूर : ‘सशक्त नारी-समाज सुखेकर’ सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना मान्यवर.

‘नारी ही विश्‍वाची आई’
कोल्हापूर : ‘अनेक आघात सहन करत जबाबदाऱ्या पार पाडणारी स्री ही धगधगती ज्वाला असून संसार सुजलाम सुफलाम करणारी नारी आहे. ही फक्त रणरागिणीच नव्हे , तर तिच या विश्‍वाची आई आहे. तिची विटंबना थांबवून आईशी कृतज्ञ राहू या, असे आवाहन कार्पोरेटर सल्लागार राजयोगी डॉ. सचिन यांनी केले. ‘ब्रमाकुमारीज पीस पॅलेस’तर्फे रुईकर कॉलनी येथे आयोजित ‘सशक्त नारी समाजाला सुखी करी’ या महिला मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजयोगिनी सुनंदादीदी होत्या. या वेळी नारी शक्तीच्या नवदुर्गा अविष्कारा अंतर्गत विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक सोहळा झाला. प्रतिभा बहेन यांनी स्वागत केले. शिवाली बहेन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, शाहू कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, डॉ. प्रीती चिंचोलीकर, मीनल शहा, जयश्री गात, उमा इंगळे, सुनिता दीदी, महिला उपस्थित होत्या. गीता बहेन यांनी सूत्रसंचालन केले. संजीवनी बहेन यांनी आभार मानले.