इचल ः बजेट वस्त्रोद्योग

इचल ः बजेट वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योगासाठी ७०८ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद
इचलकरंजी, ता. ९ ः वस्त्रोद्योगासाठी ७०८ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या सवलती कायम ठेवल्या आहेत. तर पुढील पाच वर्षासाठी लवकरच नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर होईल. त्यामुळे अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी नवीन योजना जाहीर केलेली नाही.
रोजगार निर्मितीच्या उद्देशांने वस्त्रोद्योग विभागासाठी ७०८ कोटींची तरतूद केल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. सहकारी सूतगिरण्यांच्या सवलतीसाठी २३० कोटींची तरतूद आहे. वस्त्रोद्योग प्रकल्पाच्या उभारणीसाठी भांडवली अनुदानापोटी ३१५ कोटींची गतवर्षीपेक्षा यंदा भरीव तरतूद आहे. त्यामुळे खासगी वस्त्रोदयोगातील प्रकल्प वाढीस उत्तेजन मिळेल. यंत्रमाग सहकारी संस्थांच्या भागभांडवल व कर्जवाटपासाठी निधीमध्ये कपात केली आहे.
दरम्यान, यापूर्वीच्या वस्त्रोद्योग धोरणाची मुदत ३१ मार्चला संपेल. त्यामुळे तीन महिन्यांसाठी यापूर्वीच्या धोरणाला यापूर्वीच शासनाने मुदतवाढ दिली आहे. कालावधीत जुन्याच धोरणानुसार विविध योजनांसाठी सवलत दिली जाईल. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद आहे. तर त्यानंतर पुढील पाच वर्षासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पापेक्षा नवीन वस्त्रोद्योग धोरणाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------
वस्त्रोद्योगातील ठळक तरतुदी ,
रेशीन उत्पादन विकास - २१ कोटी
वस्त्रोद्योग संकुल उभारणी - ७ कोटी
यंत्रमाग संस्थांना भागभांडवली अनुदान - १७ कोटी
यंत्रमाग संस्थांना कर्ज - २७ कोटी
वस्त्रोद्योग प्रकल्पांना भांडवली अनुदान - ३१५ कोटी
सूतकारी सूतगिरण्यांना भाग भांडवल अनुदान - १५५ कोटी
टफअंतर्गत व्याज अनुदान - ७ कोटी
-----------------
मागील वर्षातील तरतूदींचा अभ्यास करुन यंदाच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाला पोषक अशा तरतूदी केल्या आहेत. त्यामुळे नविन खासगी प्रकल्प उभारणीला बळ मिळणार आहे. तर नविन वस्त्रोद्योग धोरणाची आता प्रतिक्षा लागली असून त्यामध्ये सर्वच घटकांना भरघोस सवलती मिळण्याची अपेक्षा आहे.
अशोक स्वामी - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com