Gag101_txt.txt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gag101_txt.txt
Gag101_txt.txt

Gag101_txt.txt

sakal_logo
By

88060
गगनबावडा : जप्त केलेल्या दारूसह संशयित आरोपी व पोलिस अधिकारी.

बारा लाखांची दारू वाहतूक करणारा ट्रक जप्त
कोल्हापूर ः गोव्याहून कोल्हापूरकडे दारू वाहतूक करणऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. बारा लाखाच्या दारूसह ट्रक असा २० लाखांचा मुद्देमाल चेक नाक्यावर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक व क्लीनरवर गुन्हा दाखल केला. करुळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार नितीन खाडे नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रक (क्र. एमएचबारा-एचडी २६४४) तपासणीसाठी थांबवला असता, ट्रकच्या हौद्यात लपवलेले बॉक्स आढळले. बॉक्समध्ये गोवा बनावटीची दारू असल्याचे लक्षात आले. वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी पंचनामा करून ट्रकचालक अमीर गुलाब तांबोळी (वय २६) व रोहित रोहिदास समदडे (वय ३२ रा. पाटोदा, जि.उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक मारुती साखरे करत आहेत.