
दानोळीची यात्रा, ऊरूस सोमवारपासून
दानोळीची यात्रा, ऊरूस सोमवारपासून
दानोळी, ता. १० ः येथील हजरत पीर गैबीसाहेब उरूस व खंडोबा देवाची यात्रा सोमवार (ता. १३) ते बुधवार (ता. १५) अखेर होणार आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणा-या यात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती असते. गंधरात्र, पालखी, वाघ्यामुरळी, भरयात्रा, नैवेद्य, फटाक्याची आतषबाजी, तमाशा, शर्यती, कुस्ती, ऑर्केस्ट्रा यांसह विविध कार्यक्रम असल्याची माहिती यात्रा कमिटीची अध्यक्ष सचिन उर्फ बंडू राऊत, उपाध्यक्ष गणेश साळोखे यांनी दिली.
सोमवारी (ता.१३) गंधरात्र व खंडोबा देवाची यात्रा असून सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणूक आहे. रात्री वाघ्यामुरळीचा कार्यक्रम आहे. खंडोबा देवाची पूजा भुजींगा माने यांच्याहस्ते व प्रकाश माने यांच्या अध्यक्षखाली होईल. मंगळवारी (ता. १४) भर यात्रा असून उरूसाचा मुख्य दिवस व नैवेद्य आहे. रात्री फटाक्यांची आतषबाजी होईल. बुधवारी (ता.१५) सकाळी विविध स्पर्धा होतील. यामध्ये घोडा गाडी शर्यती, सुट्टा घोडा शर्यतीसह विविध शर्यती होतील. उद्घाटन रामचंद्र शिंदे यांच्याहस्ते तर गुंडू दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी तीन वाजता नेमलेल्या कुस्त्यांचे मैदान होणार आहे. मैदानाचे उद्घाटन बापूसो दळवी यांच्याहस्ते होईल. अध्यक्षस्थानी रावसाहेब भिलवडे आहेत. महादेव धनवडे, रामचंद्र शिंदे, गुंडू दळवी, सतिश मलमे, रामचंद्र वाळकुंजे, केशव राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे, एपीआय रणजित पाटील, राजकुमार पाराज, सुकुमार सकाप्पा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी (ता.१५) रात्री मंगला बनसोडे व नितीनकुमार करवडीकर यांचा मोफत लोकनाट्य तमाशा होणार आहे. त्याचे उद्घाटन महादेव धनवडे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सतिश मलमे आहेत. रविवारी (ता.२६) खास महिलांसाठी रात्री ९ वाजता झंकार बिटसचा ऑर्केस्ट्रा होईल. उद्घाटन सरपंच सुनिता वाळकुंजे करतील. अध्यक्षस्थानी उपसरपंच विपूल भिलवडे आहेत.
सरपंच सुनिता वाळकुंजे, उपसरपंच विपूल भिलवडे, महादेव धनवडे, रुपेश भोसले, सुशांत मलमे, गब्रु गावडे, भरत माणगांवे, सैरभ भिसे, बबन माने यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थीत होते.