
शिवाजी विद्यालयात सत्कार कार्यक़्रम
gad103.jpg
88139
गडहिंग्लज : बालवाडीच्या मदतनीस शीतल येसरे यांचा सत्कार प्रल्हादसिंह शिलेदार यांच्याहस्ते झाला. यावेळी अनुराधा पोवार, अंजली पाटील आदी उपस्थित होते.
शिवाजी विद्यालयात सत्कार कार्यक़्रम
गडहिंग्लज : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाट्यछटांचे सादरीकरण केले. शिव शाहू पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अंजली पाटील यांच्यासह मदतनीस शितल येसरे यांचा सत्कार केला. सर्वज्ञा बागडी, अनन्या बामणे, दुर्वा देसाई, आराध्या आजगेकर, अर्पिता पाटील यांनी नाट्यछटा सादर केल्या. मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा पोवार यांचे भाषण झाले. सुरेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------------------------------------------
गडहिंग्लज शाळेत शाळा सिद्धी तपासणी
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज प्राथमिक विद्यामंदिरात पंचायत समितीतर्फे शाळा सिद्धी तपासणी केली. हरिषचंद्र पाटील यांच्यासह डी. बी. पाटील, श्रीमती लोखंडे यांच्या पथकाने ही तपासणी केली. शालेय कामकाज चांगले असल्याबाबतचे मत पथकाने व्यक्त केले. पथकाने काही सूचना केल्या. प्राचार्य पंडीत पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक विजय कांबळे, शिक्षक उपस्थित होते. प्रकाश शिंदे यांनी आभार मानले.
-------------------------------------------------------
शिंदे शिक्षणशास्त्रमध्ये स्पर्धा
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध स्पर्धांना प्रतिसाद मिळाला. महिलांच्या विषयावरील भित्तीपत्रिकेचे उद्घाटन डॉ. टी. वाय. पटेल, एस. जे. घाटगे, ग्रंथपाल श्रीमती एम. डी. कापसे यांच्याहस्ते केले. वेशभूषा स्पर्धा झाली. सोनाली गावडे, सुवर्णा कुंभार, तेजस्विनी कांबळे, सानिका कुलकर्णी यांनी यश मिळवले. होममिनिस्टर स्पर्धेत शीतल पाटील यांनी यश मिळवले. ऋषीकेश बामणे यांनी प्रास्ताविक केले. आकाश गोविलकर, राहूल बिशीरोटी, अनुप गुरव, संदीप कुपटे, अभिजीत कुंभार यांची भाषणे झाली. सतीश भोसले, ओंकार पाटील, ओंकार मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप मोहिते यांनी आभार मानले.
------------------------------------------------------------
घाळी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे महिलाविषयक कायदे, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला, महिला समस्या व महिला सबलीकरण या विषयावर पोस्टर स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेत साक्षी तिबीले, पल्लवी खोत, प्रथमेश इंगळे, दिपीका सुतार, संपदा प्रधान यांनी यश मिळवले. प्रा. अनिल उंदरे, डॉ. सरला आरबोळे, डॉ. राजाराम सावंत, डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. प्रमोद पुजारी आदी उपस्थित होते. डॉ. दत्तात्रय वाघमारे, प्रा. विश्वनाथ पाटील यांनी परीक्षण केले. प्रा. फलराणी रजपूत यांनी स्वागत केले. प्रा. विलास प्रधान यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. महेश पाटील यांनी आभार मानले.