घाळी कॉलेजमध्ये नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी कॉलेजमध्ये नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
घाळी कॉलेजमध्ये नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

घाळी कॉलेजमध्ये नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

sakal_logo
By

gad105.jpg
88141
गडहिंग्लज : नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शकांचा सत्कार करताना डॉ. मंगलकुमार पाटील. शेजारी डॉ. एम. डी. पुजारी, डॉ. एस. एम. पाटील आदी.
---------------------------------------------------------------
घाळी कॉलेजमध्ये नेट-सेट
परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
गडहिंग्लज, ता. १० : येथील डॉ. घाळी महाविद्यालय, शिवराज प्रमुख अग्रणी महाविद्यालय, गडहिंग्लज विभाग व शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सेट-नेट परीक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा झाली. प्रा. सागर चौगुले, डॉ. आण्णा गोफणे प्रमुख मार्गदर्शक होते. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते.
प्रा. चौगुले यांनी केवळ प्रश्‍नावर आधारित अभ्यास न करता ज्ञान मिळवण्याच्या हेतूने अभ्यास केल्यास सेट, नेट सारख्या अवघड परीक्षासुद्धा सहजसोप्या होत असल्याचे सांगितले. डॉ. गोफणे यांनी आपण किती वाचतो यापेक्षा काय वाचतो यावर अशा परीक्षांमध्ये यश अवलंबून असते, असा सल्ला दिला. प्राचार्य पाटील यांनी परीक्षा पास करण्यासाठी व्यक्तिमत्त्‍व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. आर. एस. सावंत यांनी स्वागत केले. डॉ. एम. डी. पुजारी व डॉ. एस. एम. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यशाळेसाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील महाविद्यालयांचे शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. ओंकार खतकल्ले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. एस. मगर यांनी आभार मानले. प्रा. महेश वंडकर, डॉ. डी. एन. वाघमान, डॉ. के. एन. पाटील, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. एस. जी. जाधव व प्राध्यापक उपस्थित होते.