गडावर वन ‘विकास’ नव्हे ‘भकास’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडावर वन ‘विकास’ नव्हे ‘भकास’
गडावर वन ‘विकास’ नव्हे ‘भकास’

गडावर वन ‘विकास’ नव्हे ‘भकास’

sakal_logo
By

gad107.jpg
88158
किल्ले सामानगड : सततच्या वणव्यामुळे गडावरील वृक्षसंपदेसह जैवविविधता धोक्यात आली आहे.
-----------------------------------------------------------
गडावर वन ‘विकास’ नव्हे ‘भकास’
ेजैवविविधता धोक्यात; किल्ले सामानगडावरील वणव्याचा उत्तरार्ध भयावह
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : तालुक्यातील एकमेव ऐतिहासिक किल्ले सामानगड वणव्याच्या उत्तरार्धात भयावह दिसत आहे. गडावरील ‘वन विकास’ला ‘भकास’ स्वरूप आल्याचे चित्र किल्ल्यावर फिरताना पहायला मिळते. या वणव्याला जबाबदार कोण, अशी विचारणा होत आहे. जाळपट्ट्याबाबत गांभीर्य न घेतल्याने वन विकास महामंडळाचे गडावरील हिरवाईच्या संवर्धनात निष्काळजीपणा दिसत असल्याचा आरोप दुर्गप्रेमी करीत आहेत.
१९८८ ते २०११ पर्यंत वनखात्याच्या मालकीच्या ३५० हेक्टर क्षेत्रातील वृक्षलागवडीतून सामानगड हिरवाईने नटलेले होते. सहा लाखांवर वृक्षसंपदांनी गड, तटबंदी परिसर आणि गडाचा पठार वेढलेला होता. वनखात्याने पूर्वीपासून निर्माण केलेली ही हिरवाई आणि दुर्गवीर प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या किल्ला व परिसर संवर्धनामुळे आता कुठे तरी गडावर पर्यटकांची रिघ लागत होती. दरम्यान, आजपर्यंत कधी नव्हे इतक्या यंदाच्या वणव्यांनी अख्खा गड होरपळून निघाला आहे. यामुळे गडाला बकाल स्वरूप आले आहे. या वणव्यात दीड-दोन वर्षाच्या लागवडीतील सर्वच झाडे खल्लास झाली आहेत. मुळात लागवडीवेळीच ही झाडे दीड ते दोन फुटाचीच असल्याने ती लवकर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची चर्चा आहे.
एकही कीटक शिल्लक राहणार नाही इतक्या भयाण वणव्याने गडावरील हिरवाईचे होत्याचे नव्हते झाले आहे. करपलेली झाडे पाहून मन सुन्न व्हावे अशी भयावह स्थिती किल्ल्यावरची आहे. काजूचा मोहोर करपून गेला आहे. छोटी-छोटी आंब्याची फळगळ झाली आहे. पक्ष्‍ंयाचे खाद्य असलेले किडे-मुंग्या आगीत नष्ट झाल्‍या आहेत. यामुळे अन्नसाखळी धोक्यात येण्याचा संभव आहे. हिरवाई व खाद्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्‍यांचे थवे गडावर ठाण मांडून होते. आता हे पक्षी खाद्यासाठी नुसत्या घिरट्या मारताना दिसताहेत. त्यांची घरटी जळून खाक झालेत. त्यातील अंडीसुद्धा नष्ट झाली आहेत. आगीत काटेरी झुडुपे, गवतही जळाल्याने गडावरील भेकर, ससे, साळिंदर, गवे आदी प्राण्यांसह जैवविविधताही धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गप्रेमींतून संतापाची भावना असून ही आग कोठून आणि कोणामुळे गडावर आली याचा शोध घेण्यापेक्षा वन विकास महामंडळाने या वणव्याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
-------------
* पाण्याची गरज भागवा...
जी झाडे करपली आहेत, त्यातील बहुतांश झाडे पाण्यामुळे जगू शकतात. खालून आग आणि वरून उन्हाच्या झळांमुळे होरपळलेल्या झाडांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. ही गरज ओळखून काही दानशुरांनी पाण्याची सोय केली आहे. परंतु, हजारो झाडांना मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असून त्यासाठी समाजातील निसर्ग, पर्यावरण प्रेमींसह दानशुरांनी या झाडांच्या मदतीला धावण्याची गरज आहे.
--------------
या वर्षी प्रत्येक साईटवर जाळरेषा काढलेले आहेत. त्याचा जीपीएस रिपोर्टही आहे. कोणीतरी मुद्दामहून आग लावत असल्याचा संशय आहे. मुळात क्षेत्र अधिक व वनमजूर कमी असल्याने गस्तीला अडचण येते. गडावरील गवत कापून नेण्यासाठी प्रतिसाद नाही. उंच गवतामुळे आगीची व्याप्ती वाढली.
- रमेश कोळेकर, वनपाल, वनविकास महामंडळ गडहिंग्लज