शेतकऱ्यांचा मोर्चा

शेतकऱ्यांचा मोर्चा

88178
...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना
५ लाख रुपये अनुदान द्या

जनता दलाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


कोल्हापूर, ता. १०: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना एक लाखांऐवजी ५ लाख अनुदान द्यावे. त्यांच्या वारसांचा सरकारी नोकरीत समावेश करुन घ्यावा, या मागण्यांसाठी जनता दल (सेक्युलर) यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबांना एक लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. यामध्ये आता वाढ करुन ५ लाख रुपये केले पाहिजे. कुटुंबप्रमुख वडील, आई, मोठा भाऊ, चुलते यांच्या नावावर शेती असते. मात्र, शेतकऱ्यांच्या या पिढीतील तरुणांच्या ताब्यात प्रत्यक्ष शेती असून त्यावरच त्याचा उदनिर्वाह सुरु असतो. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, खर्चाचा ताळमेळ लागत नाही. तोटा होतो म्हणून कुटूंबाचा वैद्यकीय खर्च, मुलांना दहावी व बारावीचे शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक खर्च दिला पाहिजे. मुलींच्या लग्नात पन्नास हजार रुपयांचे अनुदान दिले पाहिजे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे फायनान्स कंपनी, पतसंस्था, सहकारी बँकांचे कर्ज विनाअट माफ करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महासचिव शिवाजीराव परुळेकर, जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शहराध्यक्ष मधुकर पाटील, संभाजी सायेकर, रवि जाधव, शालाबाई पाटील, जयश्री माने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com