‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांच्या ‘सिनेट’ मध्ये ठिय्या

‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांच्या ‘सिनेट’ मध्ये ठिय्या

फोटो-88213
88212
.............................................................................................
‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांच्या ‘सिनेट’मध्ये ठिय्या
सभागृहात अचानक घुसल्याने गोंधळ; विविध मागण्यांसाठी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः महाविद्यालयीन विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका यंदा घ्याव्यात यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी आज थेट शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) मध्ये ठिय्या आंदोलन केले. अचानकपणे सभागृहात घुसून त्यांनी घोषणा देत आंदोलन सुरू केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सिनेटच्या सभागृहात या मागण्यांबाबत चर्चा करता येणार नाही. दि. १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता चर्चेसाठी यावे, असे त्यांनी सांगितल्यानंतर हे कार्यकर्ते सभागृहातून बाहेर पडले.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात दुपारी बारा वाजता सिनेट सुरू झाली. त्यानंतर अर्धातासांनी अचानकपणे ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला. ‘भारत माता की जय’, ‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’, अशा घोषणा देत त्यांनी व्यासपीठावर ठिय्या मारला. सुरक्षारक्षकांना झुगारून त्यांचे आंदोलन सुरू राहिले. त्यामुळे सुमारे २० मिनिटे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन सिनेटचे काम ठप्प झाले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी या कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आंदोलनावर ठाम राहिले. सिनेट सदस्य अमरसिंह रजपूत, अमित कुलकर्णी, स्वागत परूळेकर, आदींनी या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले. या आंदोलनात ‘अभाविप’चे प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी, दिग्विजय गरड, दिनेश हुमनाबदे, रोहन कडोले, सूरज मालगावे, प्रवीण डीगेकर, जय पाटील, पराग कुलकर्णी, गणेश डुबल, आदी सहभागी झाले.

चौकट
आंदोलनकर्त्यांची कानउघाडणी
सिनेटमध्ये अचानकपणे आणि पूर्वपरवानगी न घेता सभागृहात प्रवेश केल्याबद्दल या आंदोलनकर्त्यांची कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कानउघाडणी केली.

चौकट
सुरक्षा ठरली फोल
विद्यापीठाच्या मुख्यप्रवेशद्वारापासून सभागृहापर्यत प्रशासनाने सुरक्षारक्षक तैनात केले होते. तरीही सिनेट सुरू असताना अचानकपणे साधारणतः १६ कार्यकर्त्यांनी सभागृहात येऊन आंदोलन केले. त्यावर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या कामावर काही अधिसभा सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
- आत्महत्याग्रस्त प्राध्यापकांच्या कुटुंबास योग्य आर्थिक मदत विद्यापीठाने करावी.
- विद्यापीठातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कायम करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.
- वारंवार होणाऱ्या पेपर फुटीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्याचे विद्यापीठाने जाहीर करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com