गाभ चित्रपट

गाभ चित्रपट

कोल्हापूर परिसरातील कलावंतांचे
गाभ चित्रपटात कौशल्यः जत्राटकर

कोल्हापूर ,ता. १० ः रेड्यांची संख्या कमी होत आहे तशी मुलीची संख्याही कमी होत आहे याची कारणमिंमासा करणारा ‘गाभ’ हा चित्रपट लवकरचे प्रदर्शित होत आहे. कोल्हापूर परिसरातील कलावंतानी एकत्र येत कौशल्य, कल्पकता पणा लावत केलेला चित्रपट आहे. त्याला प्रक्षेकांचा प्रतिसाद लाभेल असा विश्वास लेखक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी व्यक्त केला.
टाईमलॅप्स प्रोडक्शन एजे मल्टीमिडीया प्रोडक्शनची निर्मिती ‘गाभ’ चित्रपटाचे पोस्टर्स अनावरण आज झाले यावेळी ते बोलत होते. जत्राटकर म्हणाले, ‘म्हैशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणाऱ्या बदलांचीही कथा आहे. आजवर कधीही रूपरी पडद्यावर न आलेली कथा या चित्रपटातून मांडली आहे. ग्रामीण बाजाचा रांगडा नायक व कथेची पार्श्वभूमी ग्रामीण भागातील असली तरीही ती शहरी प्रेक्षकांनाही आवडेल.’
अभिनेता कैलास वाघमारे म्हणाले, ‘गाभ’ चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना सुखद धक्का असेल सर्वसामान्य माणूस त्यांच्या गुणदोषांसह नायक असू शकतो हे दर्शविणारी भूमिका आहे.’
अभिनेत्री सायली बांदकर म्हणाली, ‘‘मी शहरी भागात वाढलेली आहे. तरीही ग्रामीण भागातील कथानक असलेल्या चित्रपटात भूमिका करणे आवाहनात्मक होते’
या चित्रपट निर्माते नारायण व सूमन गोटूरे, अभिनेता विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रध्दा पवार, चंद्रशेखर जनावाडे यांच्या भूमिका आहेत. वीरधवल पाटील यांचे छायाचित्रण आहे. रवींद्र चांदेकर यांचे संगीत असूम, प्रसिध्द गायक आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांनी गीते गायली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com