किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल
किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल

किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिवल

sakal_logo
By

88239

कोल्हापूर ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘शाश्वत शेती’ विषयावर बोलताना शेतीतज्ज्ञ नरेंद्र खोत.
...

शाश्वत शेतीबाबत प्रबोधन गरजेचे
नरेंद्र खोत ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

कोल्हापूर, ता. १० ः शाश्वत शेतीबाबत प्रबोधन गरजेचे असल्याचे मत शेतीतज्ज्ञ नरेंद्र खोत यांनी आज येथे व्यक्त केले. किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड आयोजित वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘शाश्वत शेती’ या विषयावर ते बोलत होते. दरम्यान, महोत्सवाच्या सकाळच्या सत्रात पर्यावरण संवर्धनाबाबत विविध चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. सायबर महाविद्यालयात हा महोत्सव सुरू आहे.
नरेंद्र खोत म्हणाले,‘तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झाले तरीही शेतीला तरणोपाय नाही. रासायनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेती पिकवली जात असून त्याचे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सर्वदूर पाहायला मिळतील. शेतीमध्ये केवळ उत्पादन जास्त प्रमाणात घेण्याच्या स्पर्धेत सकस उत्पादन दुर्मिळ झाले आहे. एकंदरीतच या सर्व बाबींचा विचार करता शाश्वत शेतीबद्दल जास्तीत जास्त प्रबोधन होणे क्रमप्राप्त आहे.’
‘किर्लोस्कर’चे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद अजगेकर यांनी संयोजन केले. यावेळी प्रा. डॉ. दीपक भोसले, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. शर्वरी काटकर, विद्यार्थी प्रतिनिधी मोहन तायडे आदी उपस्थित होते.
------

महोत्सवात आज

चित्रपट महोत्सवाच्या उद्याच्या समारोप सत्रात सकाळी अकरा वाजता शेतीविषयक शास्त्रज्ञ संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान तर पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्ते संदीप चोडणकर यांना वसुंधरा मित्र व कचरा संकलन, व्यवस्थापन व सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या अवनी या सामाजिक संस्थेस वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.