महिलांनी आरोग्याची दक्षता घ्यावी : डॉ. स्मिता फर्नांडिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी आरोग्याची दक्षता
घ्यावी : डॉ. स्मिता फर्नांडिस
महिलांनी आरोग्याची दक्षता घ्यावी : डॉ. स्मिता फर्नांडिस

महिलांनी आरोग्याची दक्षता घ्यावी : डॉ. स्मिता फर्नांडिस

sakal_logo
By

88260
आजरा : साफल्य हॉस्‍पिटलमध्ये महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिरात बोलताना डॉ. स्मिता फर्नांडिस.

महिलांनी आरोग्याची दक्षता
घ्यावी : डॉ. स्मिता फर्नांडिस
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ : महिलांनी स्तनांचा कर्करोग होऊ नये यासाठी जागृक रहावे. आरोग्याची पुरेशी दक्षता घ्यावी. स्वपरीक्षण करावे, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्‍ज्ञ व आजरा ग्रामीण रुग्णालयाच्या माजी आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता फर्नांडिस यांनी केले.
येथील साफल्य हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. या वेळी डॉ. फर्नांडिस बोलत होत्या. शिबिरात आय स्कॅन ब्रेस्ट या मशीनच्या साह्याने महिलांची तपासणी करण्यात आली. उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. नगरसेविका सुमैय्या खेडेकर, माजी सभापती रचना होलम यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. फर्नांडिस म्हणाल्या, ‘‘चाळीस वर्षांवरील स्त्रियांनी स्वतःच्या स्तनांचे दैनंदिन स्वपरीक्षण करावे. गाठी आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.’’ शिबिरात शंभरहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. हेटेरो हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे वाशिम मकानदार व अजहर जमादार यांनी शिबिरासाठी आय स्कॅन ब्रेस्ट हे मशीन उपलब्ध करून दिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. अशोक फर्नांडिस, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. गौरी भोसले, डॉ. राजलक्ष्मी देसाई, डॉ. स्वाती गिरीबुवा, डॉ. रश्मी गाडगीळ यांनी विशेष परिश्रम घेतले.