लेख

लेख

(पुस्तकांचे संग्रहित छायाचित्र वापरावे)

पुस्तकांमध्ये रमलेला आगळा वेगळा समूह
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष न करता याच सोशल मीडियाचा सुयोग्य वापर करत पुस्तकात रमलेला, पुस्तकांवर प्रेम करणारा समूह म्हणजे ‘पुस्तकप्रेमी’ समूह अशी ओळख आता निर्माण झाली आहे. समूहाने २०२० च्या कोरोना काळापासून आजवर सलग १००० पुस्तकांचा परिचय करून दिला आहे.
-सुधांशू नाईक.

२०२० चे कोरोनाचे ते भयंकर दिवस. त्याच दरम्यान अनेकांनी आपापल्या परीने स्वतःला, कुटुंबीयांना मानसिक आनंद देणारे नवनवीन उपक्रम सुरू केले. कृष्णा दिवटे, अनंत मिसे, प्रसाद नातू, राजा बर्वे आदी मित्र हे बँकेतील नोकरीमुळे एकमेकांचे दोस्त बनलेले. त्यांनी रोज आपापसात उत्तम पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्या पुस्तकाविषयी चार ओळी लिहायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना अजून समानधर्मी मित्र मिळाले आणि मग यातूनच समूहाची दिवटे यांच्या नेतृत्वाखाली मुहूर्तमेढ रोवली गेली व ऑगस्ट २०२० मध्ये सुरुवात झाली.
एका सदस्याने रोज एक पुस्तक निवडून सलग आठवडाभर त्याला आवडतील त्या पुस्तकाचे परिचय द्यायचे. इतर सदस्यांनी सायंकाळपर्यंत त्यावर चर्चा करायची. प्रतिक्रिया, अनुभव शेयर करायचे, असं साधारण स्वरूप. सुरुवातीपासूनच या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि माझ्यासारखे शेकडो जण या दिंडीत आनंदाने सामील झाले.
आपापल्या परिचयातून अनेक साहित्यप्रेमी सहभागी झाले आहेत. सर्वजण आपापले पद विसरून येतात. एक निखळ पुस्तकप्रेमी म्हणून सहभाग नोंदवतो.
कथा, कादंबरी, चरित्र, इंग्रजी, हिंदी पुस्तके, काव्यसंग्रह अशा अनेक पुस्तकांवर निकोप चर्चा सुरू राहते. त्यामुळे नवनवीन पुस्तके विकत घेतली जातात. परस्पर आदानप्रदान होत राहते. त्याचबरोबर सुमारे दीड वर्षापासून हा समूह फेसबुकवर कार्यरत असून, आजवर ३० हजार सदस्य जोडले गेले आहेत. दर महिना साधारण दोन हजार नवीन लोक समूहाशी जोडले जात असून, आता या सर्व कार्याला एका विधायक चळवळीसारखे सकारात्मक रूप आले आहे.
आठवड्यातून एकदा सायंकाळी विविध थिमनुसार कवितांचे सादरीकरण, काही मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या जातात. गेली दोन वर्षं दिवाळी अंकांची निर्मिती केली गेली. असे विविध उपक्रम इथं सर्वजण मिळून राबवतो. त्याचबरोबर समाजात काही गंभीर समस्या उभी राहिल्यास सामाजिक बांधिलकीही मानतो. कोल्हापूर आणि चिपळूणचा महापूर या संकटाच्या वेळी समूहातील सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या परीने पूरग्रस्तांना मदतीचा आधार दिला, हे त्याचं एक उदाहरण.
आमच्यासाठी १००० किंवा ५००० पुस्तकं असं काही उद्दिष्ट नाही. कारण हा समूह यापलीकडे जात आहे; मात्र ही चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी, ज्यामुळे पुस्तकांवर असलेले लोकांचे प्रेम अजून वाढत राहावे, असे वाटते.
पुस्तकं आपल्याला आनंद देतात, दिशा देतात. त्यामुळे अधिकाधिक पुस्तकांचा सहवास मिळत राहावा, त्यावर गप्पा माराव्यात, हाच निखळ उद्देश मनाशी बाळगून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे हा समूह आता आयुष्याचाच एक भाग बनून गेला आहे, हे सांगताना आनंद आणि अभिमान वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com