केएमटीचे २० लाख

केएमटीचे २० लाख

कणेरी मठासाठी वापरलेल्या
केएमटी बसचे २० लाख देणे बाकी

कोल्हापूर, ता. १० ः कणेरीमठावरील सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव होऊन पंधरा दिवस होत आले. मात्र, त्यासाठी पाठवलेल्या केएमटी बसेसचे २० लाख रुपये अजूनही दिलेले नाहीत. त्यासाठी दोनवेळा पत्रे देण्यात आली आहेत.
केएमटी आर्थिक अडचणीत असताना लोकोत्सवासाठी दिलेल्या बसेसमुळे बुडत्याचा पाय आणखीन खोलात गेला आहे. शहरातील बस सेवा विस्कळीत करून रोखीचा व्यवसाय थांबवून उत्सवासाठी बस पाठवण्यात आल्या. त्यासाठीचा खर्च केएमटीनेच उचलला आहे. या आठ दिवसांतील खर्चासाठी केएमटीने २० लाख रुपये मिळावेत अशी मागणी केली आहे. मात्र, आजतागायत एक रुपयाही केएमटीला मिळालेला नाही. केएमटी अडचणीत असताना शासनाने ही सेवा केएमटीला द्यायला सांगून मोडक्या कुपावरच पाय दिला आहे. आता शासनानेच त्या खर्चाचे पैसे केएमटीला देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा केला जात असल्याबाबत अॅड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com