
१०२ पूल
00283
पुलाच्या कामाला मुहूर्त कधी?
नंदगाव-दिंडनेर्ली डावा कालवा; तटबंदीअभावी वाहनधारकांना धोका
सचिन चौगले : सकाळ वृत्तसेवा
नंदगाव, ता. १० : नंदगाव-दिंडनेर्ली (ता. करवीर) येथून जाणाऱ्या डाव्या कालव्यावरील पुलाचे काम सुरू कधी होणार याची प्रतीक्षा आहे. मुख्य रस्त्याचे खोदकाम करून त्याला पर्यायी रस्ता वाहतुकीस तयार केला आहे; परंतु या पर्यायी रस्त्याची चाळण झाली आहे. कालवा व रस्ता यामध्ये भराव टाकून तटबंदी केलेली नाही. त्यामुळे हा रस्ता दुर्घटनाग्रस्त बनला आहे.
नंदगावच्या कालव्यावरील रस्ता हा कोल्हापूर व गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीला जोडल्याने या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीकडून रात्रपाळी करून येणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे. खराब रस्ता व रस्त्याच्या व कालव्यामध्ये तटबंदी नसल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दिंडनेर्ली नंदगावच्या कालव्यालगतच्या रस्त्याची अवस्थाही काही वेगळी नाही. या दोन्ही ठिकाणी खराब रस्ता व तटबंदी नसल्यामुळे संबंधित विभागाने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कोट
कालव्यावरील पर्यायी रस्त्याची अतिशय वाईट दुरवस्था झाली आहे. कालव्याला तटबंदी नसल्यामुळे व खराब रस्त्यामुळे
संबंधित विभागाने याबाबत लवकर उपाययोजना कराव्यात.
- सुभाष कुंभार, नागरिक, नंदगाव.
कोट
येत्या आठवड्यात दोन्ही पुलांचे काम सुरू होईल व तोपर्यंत पर्यायी रस्ता चांगला करून कालव्याच्या कडेला तटबंदी उभारू. त्यावर अंधारात दिसेल असा रिफ्लेक्टरचा सूचना फलकही लावला जाईल.
- प्रशांत कांबळे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग- कोल्हापूर.