धरणग्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणग्रस्त
धरणग्रस्त

धरणग्रस्त

sakal_logo
By

धरणग्रस्तांचे आंदोलन
अकराव्या दिवशीही सुरूच

कोल्हापूर, ता. १० : जिल्हा सुजलाम्-सुफलाम् करण्यात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्या धरणग्रस्तांना अजूनही न्याय मिळालेला नाही. शासनाकडून त्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही. अशा परिस्थितीत शुक्रवारी (ता.१०) अकराव्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच होते. जिल्हाधिकारी शुक्रवारी मुंबईला बैठकीसाठी गेले असून, उद्या (ता.११) यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे

राज्यातील विविध धरणांचे बांधकाम झाले. यावेळी शासनाने डोंगरी भागातील लोकांच्या जमिनी घेतल्या. त्यांना पर्यायी जमिनी देणे किंवा मोबदला देणे बंधनकारक असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक वर्षी आंदोलनाची ही धग तेवत ठेवावी लागते. काही तरी आश्‍वासने मिळतात आणि आंदोलन स्थगित करावे लागते. शासनाकडून जी आश्‍वासने दिलेली जातात, त्यांची पूर्तता होत नाही. मग पुन्हा पुढील वर्षी आंदोलन केले जाते, असे आणखी किती दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून जीवन जगायचे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. धरणग्रस्तांच्या हक्कासाठी आणखी कितीही दिवस आंदोलन करण्याची तयारी आहे. लोकांना हक्काची आणि स्वत:ची जागा मिळत नाही, मुलांना शासकीय नोकरीत संधी मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून आला. गेल्या दहा दिवसांपासून सामाजिक काम करणारे अनेक लोक जेवण किंवा इतर साहित्य देतात. आता मात्र जेवणाची सक्त गरज आहे, अशी परिस्थिती आहे. यासाठी आंदोलनाला बळ देणाऱ्या समाजसेवी लोकांनी आंदोलकांना जेवण उपलब्ध करून देण्याची गरज आहे.