लेखनासाठी संवेदनशीलता महत्वाची; डॉ. रघुनाथ कडाकणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेखनासाठी संवेदनशीलता महत्वाची; डॉ. रघुनाथ कडाकणे
लेखनासाठी संवेदनशीलता महत्वाची; डॉ. रघुनाथ कडाकणे

लेखनासाठी संवेदनशीलता महत्वाची; डॉ. रघुनाथ कडाकणे

sakal_logo
By

88371
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात झालेल्या कार्यशाळेत बोलताना डॉ. रघुनाथ कडाकणे. व्यासपीठावर डॉ. दत्ता पाटील, प्रा. अनिल उंदरे.

लेखनासाठी संवेदनशीलता महत्त्वाची
डॉ. रघुनाथ कडाकणे; घाळी महाविद्यालयात लेखन कौशल्य कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : लेखन हे फक्त कौशल्य नाही, तर त्यासाठी अनुभव, चिंतन आणि सराव या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. जी निर्मिती यापूर्वीही झालेली नाही आणि भविष्यकाळातही होणार नाही, अशी निर्मिती म्हणजे लेखन कौशल्य होय. लेखनासाठी जीवनानुभव, शब्दाचे मोल आणि संवेदनशीलता महत्त्वाची आहे, असे मत कवी, कादंबरीकार डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयात एकदिवशीय लेखन कौशल्य कार्यशाळा झाली. याप्रसंगी डॉ. कडाकणे बोलत होते. मराठी, हिंदी व इंग्रजी विभागातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
पहिल्या सत्रात डॉ. नीलेश शेळके यांनी कविता व कथालेखन कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. सरोज बिडकर यांनी प्रवास वर्णन आणि समीक्षा लेखन कौशल्य, तर तिसऱ्या सत्रात डॉ. दत्ता पाटील यांनी नाट्यछटा, वैचारिक लेखन आणि मुलाखत लेखन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी लेखन कौशल्य महाविद्यालयीन जीवनातच अंगी रुजले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
प्रा. अनिल उंदरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. प्रा. एस. व्ही. प्रधान, प्रा. महेश पाटील यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. वंदना खोराटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नागेश मासाळ यांनी आभार मानले.